लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्ह्यात राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या एकमेव ग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात रोजगार निर्मितीचे प्रयत्न करण्याची ओरड सुरू झाली आहे. या आशयाचे ठराव ग्रामपंचायत मार्फत राज्य शासनाला पाठविले जाणार असल्याची माहिती सरपंच उर्मिला हेमराज लांजे यांनी दिली आहे.सिहोरा परिसरात नंदनवन म्हणून ग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाची ओळख आहे. निसर्ग वैभव व सातपुडा पर्वत रांगाचे घनदाट जंगल पर्यटकांना आकर्षित करित असताना बेरोजगारांना रोजगार निर्मितीचे प्रयत्न शासन तथा विविध विभाग मार्फत करण्यात आले नाही. या पर्यटन स्थळात आकर्षणाचे केंद्र ठरत असणारा चांदपूर जलाशय आहे. परंतु जलाशयात बोटींग व्यवसायाला मंजुरी देण्यात आली नाही. बोटींग व्यवसायाचे माध्यमातून रोजगार निर्मिती करिता प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. परंतु या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मानसिकता पाठबंधारे विभागाने दाखविली नाही. गावातील मागासवर्गीय बहुउद्देशिय मत्स्यपालन सहकारी संस्थेने बोटींग व्यवसाय मंजुरी करिता प्रस्ताव सादर केला आहे.हा प्रस्ताव आजवर पुढे सरकला नाही. यामुळे अनेक बेरोजगार तरूणाचा रोजगार बुडाला आहे. या पर्यटन स्थळात वन्य प्राणी आहेत. घनदाट जंगलाचे विस्तारीत क्षेत्र आहे. या जंगलात जंगल सफारी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली नाही. या शिवाय प्रस्ताव मंजुरीच्या दिशेने प्रयत्न सुरू करण्यात आले नाही. विस्तारित जलाशय आणि टाकी असताना यात जलतरण आदी कार्यात रोजगार निर्मितीचे शासन स्तरावर प्रयत्न करण्यात आले नाही. सन २०१२ पासून पर्यटन स्थळात विकास थांबला आहे. पर्यटन स्थळाचे विकास करणारे प्रयत्न आटले आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या पर्यटन स्थळात विकास करणारा असल्याची माहिती मध्यंतरी होती. पर्यटन स्थळात आमदार चरण वाघमारे यांचे प्रयत्नाने १ कोटी ८४ लाख रूपये खर्चाचे विश्रामगृह बांधकाम मंजुर करण्यात आले आहे. या विश्रामगृहात दर्जेदार आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. विश्रामगृहाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहेत. अन्य कामे मात्र प्रभावित आहेत. चांदपूर गाव आणि परिसरात अनेक रोजगारांची साधने आहेत. परंतु या साधनांना निर्मितीची जोड दिली जात नाही.या गावाची एक संस्कृती आहे. याच गावाचे हद्दीत श्रद्धास्थान असणारे जागृत हनुमान देवस्थान, ऋषी मुनी आश्रम आणि चांद शाँ वलीचा दरगाह आहे. याशिवाय डोंगर दऱ्यात हिंसक प्राण्यांचे गुफा आहेत. वनविभागाची पर्यटक आणि भक्त भाविकांना भुरळ घालणारी नर्सरी आहे. वर्षभर रोजगार उपलब्ध करण्याची क्षमता आहे. परंतु राजकीय इच्छाशक्तीचे अभाव आहे.
रोजगार निर्मितीचे प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 10:43 PM
भंडारा जिल्ह्यात राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या एकमेव ग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात रोजगार निर्मितीचे प्रयत्न करण्याची ओरड सुरू झाली आहे. या आशयाचे ठराव ग्रामपंचायत मार्फत राज्य शासनाला पाठविले जाणार असल्याची माहिती सरपंच उर्मिला हेमराज लांजे यांनी दिली आहे.
ठळक मुद्देचांदपूर पर्यटन स्थळ : बोटिंग व्यवसायाची मंजुरी अडली