लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : दिवसेंदिवस जाणवणारी कोळशाची टंचाई व वाढते वीजेचे दर लक्षात घेता गावागावात शेतकऱ्यांसाठी सौर उर्जा निर्मितीची योजना शासनाने आणली आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांनी या प्रकल्पाद्वारे स्वस्त वीज देण्याचा शासनाचा मानस आहे. स्व. नामदेवराव दिवटे यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांच्या लाखांदूर येथील स्मारकासाठी पालकमंत्र्यांच्या अधिकारातील जिल्हा नियोजनचा ५० लाखांचा अतिरिक्त निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.लाखांदूर येथील तालुका क्रिडा संकुल, स्व.नामदेवराव दिवटे स्मारक व युवा मार्गदर्शन केंद्राच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार बाळा काशिवार, नगराध्यक्षा भारती दिवटे, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, तहसिलदार संतोष महाले, निर्मलाताई नामदेवराव दिवटे, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत,प्रल्हाद देशमुख, प्रभारी जिल्हा क्रिडा अधिकारी दोंदल, मुख्याधिकारी राहूल परिहार, प्रकाश मालगावे, राजेश बांते उपस्थित होते.६.२५ कोटी रुपये खर्च करुन स्व. नामदेवराव दिवटे स्मारक, युवा मार्गदर्शन केंद्र व तालुका क्रिडा संकुल लाखांदूर येथे उभारण्यात येणार आहे. या कामाचे शुक्रवारला पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. पालकमंत्री म्हणाले, स्व. नामदेवराव दिवटे यांनी या परिसराच्या विकासासाठी खुप मेहनत घेतली. त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारण्यात येणार आहे. वीजेची वाढती मागणी व निर्मिती पाहता कोळशापासून निर्मित वीज देणे शक्य होणार नाही ही बाब लक्षात घेता सौर उर्जा हा अत्यंत चांगला पर्याय आहे. प्रत्येक गावात १००-२०० शेतकरी मिळून सौर उर्जेवर वीज निर्मितीचा प्रकल्प लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. शासन यासाठी सर्वोतोपरी मदत करणार आहे. यासाठीची योजना तयार केली असून या योजनेचा राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजनचा निधी १४० कोटीवर नेला आहे. या पूर्वी तो ९० कोटी रुपयांचा होता. या निधीमधून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सर्वांसाठी घरे, आयुष्मान भारत, पालकमंत्री पांदण रस्ते व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा लाभ जिल्हयातील सर्व नागरिकांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आयुष्मान भारत योजनेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील १० कोटी कुटूंबातील ५० कोटी व्यक्तींचा आरोग्य विमा उतरविला असून यासाठी ५ लाख रुपयाचे विमा कवच देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सर्वांसाठी घरे या योजनेत गरीब प्रत्येक कुटूंबाला २०२२ पर्यंत घर देण्यात येणार आहे.आमदार बाळा काशिवार म्हणाले, स्व. नामदेवराव दिवटे यांचे स्मारक उभे करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तो आज पूर्ण होत आहे. या स्मारकाचे एका वर्षात लोकार्पण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यासोबतच लाखांदूर येथे समाज मंदिर बांधण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे २ कोटी रुपयांची मागणी केली असून ती लवकरच पूर्ण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हे स्मारक युवा मार्गदर्शन केंद्र असणार आहे. ज्यातून युवकांना करिअर घडविण्याची प्रेरणा मिळेल, या कार्यक्रमाला गावकरी व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना स्वस्तात वीज देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 10:59 PM
दिवसेंदिवस जाणवणारी कोळशाची टंचाई व वाढते वीजेचे दर लक्षात घेता गावागावात शेतकऱ्यांसाठी सौर उर्जा निर्मितीची योजना शासनाने आणली आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांनी या प्रकल्पाद्वारे स्वस्त वीज देण्याचा शासनाचा मानस आहे.
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : लाखांदूर येथे नामदेवराव दिवटे स्मारक व क्रीडा संकुलाचे भूमिपूजन