आॅनलाईन लोकमतभंडारा: क्षयरोग तसेच कृष्ठरोगाबाबत समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे असून जागृती आणि नियमित औषधोपचार यामुळे या रोगांवर नियंत्रण शक्य असल्याचे प्रतिपादन साकोलीचे आमदार राजेश काशिवार यांनी व्यक्त केले.साकोली येथे प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाºया क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मिशन इंद्रधनुष्य, कुष्ठरोग, क्षयरोग तसेच मिशन परिवार विकास या आरोग्याच्या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने साकोली येथील आशिर्वाद लॉन येथे केले होते.यावेळी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. मनिषा साकोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने, आरोग्य सहाय्यक एन.व्ही. बावनकर, आरोग्य पर्यवेक्षक के.जी. नैताम, नंदलाल पाटील कापगते महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर. गोमासे उपस्थित होते.या प्रसंगी बोलतांना आमदार काशिवार यांनी, क्षयरोग तसेच कुष्ठरोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम अंगणवाडी सेविका करीत असून सोबतच कर्करोगाबाबत सुध्दा जनजागृती होणे गरजेचे आहे. या कार्यक्रमातून प्राप्त झालेली माहिती आपल्यापर्यंत न ठेवता ती इतरांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन आमदार काशिवार यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले.यावेळी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. मनिषा साकोरे यांनी कुष्ठरोगाबाबत मागदर्शन केले. तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी क्षयरोगाबाबतची माहिती दिली.या दोन्ही आजाराबाबतच तपासणी तसेच वैद्यकीय उपचार सर्व शासकीय रुग्णालयातून मोफत दिली जात असल्याची माहिती डॉ. साकोरे तसेच डॉ. वानखेडे यांनी यावेळी दिली. मिशन इंद्रधनुष्य याबाबत एम. व्ही. बावनकर यांनी मार्गदर्शन करुन मुलांचे तसेच गरोदर मातांचे लसिकरण वेळेवर केल्यास अनेक आजाराची लागण होण्यापासून फायदा होतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने यांनी केले. या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पधेर्तील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कुष्ठरोग, क्षयरोग यांची माहिती देणारी प्रदर्शनी आरोग्य विभागाच्या वतीने लावण्यात आली होती. पंचायत समिती तसेच एकात्मिक प्रकल्प विकास विभागाच्या वतीने सुध्दा प्रदर्शनी लावण्यात आली होती. या निमित्ताने जनजागृती रॅली सुध्दा काढण्यात आली. साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत यांनी या रॅलीस हिरवी झेंडी दाखविली.
क्षयरोग जनजागृतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 10:33 PM
क्षयरोग तसेच कृष्ठरोगाबाबत समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे असून जागृती आणि नियमित औषधोपचार यामुळे या रोगांवर नियंत्रण शक्य असल्याचे प्रतिपादन साकोलीचे आमदार राजेश काशिवार यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देराजेश काशीवार : साकोली येथे प्रसारण मंत्रालयाचा कार्यक्रम