शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तुमसर नगर पालिकेत स्वीकृत सदस्यपदी पडोळे, घरडे यांची वर्णी

By admin | Published: February 09, 2017 12:25 AM

नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी बुधवारला सकाळी ११.३० वाजता मावळते नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्याकडून नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.

नगराध्यक्ष प्रदीप पडोळेंचे पदग्रहण : उपाध्यक्षपदी कांचन कोडवानीतुमसर : नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी बुधवारला सकाळी ११.३० वाजता मावळते नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्याकडून नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यपदासाठी निवडणूक पार पडली. २३ सदस्यीय नगर पालिकेत भाजपचे १५, राकाँचे २, काँग्रेसचे ३, अपक्ष ३ असे बलाबल आहे. उपाध्यक्षपदाकरिता भाजपकडून कांचन कोडवानी यांनी तर राकाँकडून सलाम तुरक यांनी अर्ज दाखल केला. सलाम तुरक यांनी अर्ज मागे घेतल्याने कोडवानी यांची अविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्यपदा करिता भाजपतर्फे कैलाश पडोळे, प्रमोद घरडे, शैलेश मेश्राम, सूरज पशिने, सुनिल लांजेवार, शैलेश साखरवाडे यांची नावे स्वीकृतीकरिता पाठविली होती. भाजपने कैलाश पडोळे व प्रमोद घरडे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्याचा निर्णय घेतला. कार्यभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष प्रदीप पडोळे हे खुर्चीवर विराजमान झाले. यावेळी उपाध्यक्ष कांचन कोडवानी, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी विकासकामांचा धडाका सुरुच राहील. शहरातील छोटी मोठी कामेसुद्धा प्राधान्याने केली जातील असे सांगितले. भाजपातर्फे आयोजित पदग्रहण समारंभात आमदार प्रा.अनिल सोले, आमदार चरण वाघमारे, माजी खासदार शिशुपाल पटले, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, डॉ.सच्चिदानंद फुलेकर, माजी आमदार मधुकर कुकडे, श्रीकांत जोशी, ललीतकुमार थानथराटे, रामकुमार गजभिये, उल्हास फडके, भंडाऱ्याचे नगरसेवक मंगेश वंजारी, चंद्रशेखर रोकडे, मुकेश थानथराटे, विक्रम लांजेवार उपस्थित होते. संचालन ललीत शुक्ला यांनी तर आभारप्रदर्शन नगरसेवक मेहताबसिंग ठाकुर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)नगरसेवकांशी शाब्दिक बाचाबाचीकैलाश पडोळे व प्रमोद घरडे यांच्या नावाची घोषणा पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केली. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक अमरनाथ रगडे व बाळा ठाकूर यांनी आक्षेप नोंदविले. पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांना स्वीकृत सदस्य निवडीचे निकष काय आहेत असा काँग्रेसचे नगरसेवक अमरनाथ रगडे व बाळा ठाकुर यांनी विचारला. तेव्हा नगराध्यक्ष पडोळे व नगरसेवक रगडे व ठाकुर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. सभेत गदारोळ झाला. जोरजोराने आवाज बाहेर येत असल्याने भाजपच्या कार्यकर्ते सभागृहात जाण्याकरिता प्रयत्न केला. महिला नगरसेविका या गदारोळात अक्षरश: घाबरुन गेल्या. काय होत आहे हे त्यांना क्षणभर कळलेच नाही. १५ ते २० मिनिटे सभेत गदारोळ सुरुच होता. इतर सदस्यांनी मध्यस्थी करून गदारोळ शांत केला. परंतु येथे सत्ताधारी व विरोधक असा सामना यापुढेही सुरु राहण्याची शक्यता आहे.