१३ लोक २३ के
तुमसर : काही महिन्यांपासून तुमसर नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी यांचे पद रिक्त आहे. आठ दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील रिक्त मुख्य अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली; परंतु तुमसर पालिकेला नियमित मुख्याधिकारी अद्याप देण्यात आला नाही. त्यामुळे सोमवारी संतप्त नगरसेवकांचा मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला. त्यामुळे येथे मुख्याधिकारी देता का मुख्याधिकारी, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
भंडारा जिल्ह्यात तुमसर नगर परिषद क्रमांक दोनची आहे. येथे काही महिन्यांपासून मुख्य अधिकाऱ्यांची पद रिक्त आहे. भंडारा येथील मुख्याधिकाऱ्याकडे येथील पालिकेचा प्रभार देण्यात आला होता. आठ दिवसांपूर्वी शासनाने जिल्ह्यातील रिक्त मुख्याधिकाऱ्यांची पदे भरली; परंतु तुमसर पालिकेत नियमित मुख्याधिकारी यांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे सोमवारी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या रिक्त खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला. यावेळी माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अमरनाथ रगडे, बांधकाम सभापती सचिन बोपचे, नगरसेवक राजेश ठाकूर, रजनीश लांजेवार, सुनील पारधी, सलाम तुरक, तिलक गजभिये, शिव बोरकर आदी उपस्थित होते.