लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देशभरात कोरोना संसर्गाने थैमान घातले असताना सर्वत्र स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र तुमसर शहरात मात्र स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोना संसर्गावर आळा बसावा म्हणून गावागावांत मोठ्या प्रमाणात स्वच्छता केली जात आहे. तुमसर शहरातील विविध प्रभागात धूर फवारणी करुन स्वच्छतेचा कांगावा नगर परिषदेकडून करण्यात येत आहे. तुमसर नगर परिषद मात्र सद्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराची स्वच्छता ठेवण्यात पुर्णपणे अपयशी ठरली असल्याची नागरिकातून ओरड होत आहे.येथील मालवीय नगरातील रजा ले आऊटमध्ये नालीच्या दुरुस्तीअभावी नालीतील घाण पाणी गेल्या अनेक दिवसांपासून थांबल्याने या पाण्यात आळ्या झाल्या आहेत. परिसरात पाण्याचा दुर्गध येत असल्याने येथील नागरीक कोरोनासह दुर्गधीयुक्त पाण्याने त्रस्त झाले आहेत.नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. नागरीकांना दररोज जीव मुठीत घेऊन जगावे लागत असून अनेकदा याबाबत नगरसेवकांना निवेदन देण्यात आले आहे. याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील रहिवाश्यांनी केला आहे.तीन वर्षापासून नागरिकांची ओरड होत आहे. मात्र केवळ २० फुटाचे नाली बांधकाम असल्याने आज पर्यंत नाली बांधकाम रेंगाळले आहे. कोरोनामुळे तुमसर शहरातील नागरिक आधीच संकटात सापडला असल्याने नव्याने रुजू झालेले मुख्यधिकारी देशमुख जातीने लक्ष घालतील अशी अपेक्षा नगर वासीयांनी व्यक्त केली आहे.सांडपाण्याचा प्रश्न गंभीरस्थानिक मालवीय नगरातील रजा ले आऊट मधील सौर्दयीकरण करण्याचे काम सुरु आहे. मात्र लगतच असलेल्या लेआऊट मधील अवघ्या दहा दहा फुटाच्या दोन्ही बाजूची २० फूट नाली व त्यावरील कव्हर चे बांधकाम अजूनही अपूर्ण ठेवण्यात आले आहे. परिणामी परिसरातील सांडपाणी जिथपर्यंत नाली आहे तिथपर्यंत वाहत येऊन खुल्या जागेत पाणी साचते आहे. सांडपाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आहे.
तुमसर नगर परिषदेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 5:00 AM
मालवीय नगरातील रजा ले आऊटमध्ये नालीच्या दुरुस्तीअभावी नालीतील घाण पाणी गेल्या अनेक दिवसांपासून थांबल्याने या पाण्यात आळ्या झाल्या आहेत. परिसरात पाण्याचा दुर्गध येत असल्याने येथील नागरीक कोरोनासह दुर्गधीयुक्त पाण्याने त्रस्त झाले आहेत. नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. नागरीकांना दररोज जीव मुठीत घेऊन जगावे लागत असून अनेकदा याबाबत नगरसेवकांना निवेदन देण्यात आले आहे.
ठळक मुद्देकोरोनाच्या संकटात नागरिक त्रस्त : नवीन मुख्याधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या