शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

तुमसर पंचायत समिती सदस्य अधिकारांचे ‘पंख’ छाटले

By admin | Published: September 08, 2015 12:37 AM

सहा हजारपेक्षा अधिक मतदारांचे नेतृत्व, विकास कामांची गावात बोंबाबोंब, यामुळे पंचायत समिती सदस्य हैराण झाली आहे.

चुल्हाड (सिहोरा) : सहा हजारपेक्षा अधिक मतदारांचे नेतृत्व, विकास कामांची गावात बोंबाबोंब, यामुळे पंचायत समिती सदस्य हैराण झाली आहे. राज्य शासनाने त्यांचे अधिकाराचे पंख छाटल्याने चेहरे हिरमुसले आहेत. या संदर्भात ग्राम विकास मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी दिली आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे व्यापक अधिकाऱ्यांना कात्री लावण्यात आली आहे. शासन स्तरावर प्राप्त होणारे अनुदान थेट ग्रामपंचायतकडे वळते करण्यात येत असल्याने पंचायत समिती सदस्यांचे महत्व कमी होणार आहे. राज्य अंतर्गत या सदस्यांची संघटना कार्यरत नाही. या शिवाय सहा हजार पेक्षा अधिक नागरिकांचे नेतृत्व करीत असताना विधान परिषद निवडणुकीत या सदस्यांना मतदानाचे अधिकार नाहीत. याउलट ३ हजार नागरिकांचे नेतृत्व करणाऱ्या नगरपरिषद क्षेत्रातील नगरसेवकांना या अधिकारात समावेश करण्यात आलेला आहे. हा अन्यायकारक निर्णय असल्याची कुजबूज सुरु झाली आहे. पंचायत समिती सदस्यांना व्यापक अधिकार देण्यासाठी कुणी राज्यस्तरावर मांडणारेवाली नाही. पंचायत समिती सदस्यांना क्षेत्रात विकास कामे करण्यासाठी निधी देण्यात येत नाही. यामुळे त्यांना वरिष्ठ लोकप्रतिनिधींना अजिजी करावी लागत आहे. दरम्यान गावात सदस्यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडण्याची पाळी आली आहे. रस्ते, नाली, प्रवाशी, निवारे, सभामंडप, मंदिराचे जीर्णोद्धार, पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत, आपातकालीन मदत आदी कामाची मागणी या सदस्यांना नागरिक करीत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पंचायत समिती स्तरावर असा स्वतंत्र निधी प्राप्त होत नसल्याने सदस्यांचे डोक्याला ताप आणणारे चित्र गावात निर्माण झाले आहे. दरम्यान पंचायत समिती स्तरावर सदस्य शो पीस ठरणारे चित्र निर्माण झाले आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना देताना साधी विचारपूस करण्याचे अधिकारही या सदस्यांना राहिले नाहीत. ग्रामसभेतून निवड अर्जाचा पुरवठा तथा जिल्हा परिषद मधून मंजुरी असा योजना देताना प्रवास असल्याने पंचायत समिती सदस्य मध्यमवर्गीय समाजात वास्तव्याची भूमिका बजावत आहेत. गावात विकास कामांचा भडीमार करण्यात ये असल्याने ना बाबा ना असा सूर पंचायत समिती सदस्यांकडून ऐकविला जात आहे. दरम्यान पंचायत समिती स्तरावर विकासाची तिजोरी रिकामी असल्याने महिला सदस्यांनी फेरफटका मारणेही टाळले आहे. विकास मुद्यांवर भांडायचे झाल्यास निधी कुणाला मागावे, या संभ्रमात सदस्य आहेत. यामुळे मासिक सभेत जनतेच्या विकासाचे मुद्दे चर्चेत येत नाही. फक्त मासिक भत्ता उचल करण्यासाठी पंचायत समितीत हजेरी लावण्याची वेळ या सदस्यांवर आली आहे. विकास कामाचे नियोजनसह अनेक अधिकाऱ्यांच्या प्राप्तीसाठी सदस्यांचे शिष्टमंडळ राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत. (वार्ताहर)पंचायत समिती स्तरावर विकास निधी नसल्याने डोकेदुखी वाढली आहे. गावकऱ्यांच्या रोषाला सदस्यांना बळी पडावे लागत आहे. अधिकारांसाठी सदस्यांचे शिष्टमंडळ मंत्र्यांची भेट घेणार आहे.- हिरालाल नागपुरेपं.स. सदस्य, तुमसर.