शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

तुमसर तालुका ‘ओडीएफ’ हागणदारीमुक्त

By admin | Published: April 02, 2017 12:24 AM

‘मुक्त हागणदारी कडून हागणदारी मुक्तीकडे’ हे ब्रिद ठेवून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत तुमसर तालुका (ओडीएफ) हागणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले.

सातत्य ठेवण्याचे आवाहन : स्वच्छ भारत मिशन कक्ष व पं.स. पदाधिकाऱ्यांची कामगिरीभंडारा / तुमसर : ‘मुक्त हागणदारी कडून हागणदारी मुक्तीकडे’ हे ब्रिद ठेवून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमांतर्गत तुमसर तालुका (ओडीएफ) हागणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या एका छोट्याखानी कार्यक्रमात ही घोषणा पंचायत समिती सभापती कविता बनकर, खंडविकास अधिकारी विजय झिंगरे यांनी केली. स्वच्छ भारत मिशन जिल्हा कक्ष भंडारा व गटसंसाधन केंद्र, पाणी व स्वच्छता चमू, तालुकास्तर व जिल्हा स्तरावरील चमूच्या नेतृत्वात सन २०१६-१७ या वर्षात तुमसर तालुका हागणदारीमुक्त करण्याचे ठेवण्यात आले होते. २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार तुमसर तालुका अधिकृतरित्या हागणदारीमुक्त (ओडीएफ)नुसार घोषित करण्यात आले. पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती कविता बनकर, खंडविकास अधिकारी विजय झिंगरे, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे, मुन्ना फुंडे, शिशुपाल गौपाले, जितेंद्र सयाम, मंगला कानतोडे, विमल कनपटे, सहाय्यक खंडविकास अधिकारी एस.एन. गायधने, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभणे, माहिती शिक्षण विस्तार अधिकारी राजेश येरणे, विस्तार अधिकारी पी.व्ही. ठवरे, विजय कुथे, एस.डी. घटारे, के.आय. राऊतकर, गटसमन्वयक पल्लवी तिडके, समूह समन्वयक हर्षाली थोटे, अनिता कुकडे, शशीकांत घोडीचोर, पाणी व गुणवत्ता सल्लागार पौर्णिमा डुंभरे तथा तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.तुमसर तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छता मिशन कक्षाच्या चमूने येथील पंचायत समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सर्व स्तराचे अधिकारी व सदस्यगण यांना हागणदारीमुक्तीची संकल्पना व महत्व पटवून दिले. त्यानंतर प्रत्येकाने हिरहिरीने तालुका हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्नच केले नाही तर त्यात यशस्वी होऊन अशी घोषणाही करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उपसभापती शेखर कोतपल्लीवार यांनी प्रत्येक ग्रामस्थांनी व अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ही जनजागृती अशीच तेवत ठेवावी व सर्वांनी गाव सर्वांग सुंदर बनविण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करावे व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी एस.डी. घटारे यांनी केले. तर प्रास्ताविक राजेश येरणे यांनी केले. (शहर / तालुका प्रतिनिधी)सारेच सरसावलेगाव व संपूर्ण तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी या चमूने ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, शिक्षक, शिक्षिका, आंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थांना एका विचारमंचात एकत्र आणले. त्यांना महत्व पटवून दिल्यानंतर प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून त्या दृष्टीने अन्य गावकऱ्यांना शौचालय बांधकाम करण्याचे महत्व पटवून दिले. त्यामुळे अनेकांनी तातडीने शौचालय बांधून त्याचा वापर सुरु केला आहे. ध्येयपूर्तीसाठी धडपडले वाहनचालकतालुक्यातील अनेक गावांमध्ये शौचालय असतानाही अनेकांनी त्याचा वापर न करता उघड्यावर प्रक्रिया करीत होते. त्यामुळे गाव विकासाला ते बाधा ठरत असल्याने मिशन कक्षाने अनेक गावात भल्या पहाटेच ठाण मांडून उघड्यावर जाणाऱ्यांना प्रतिबंध घातला. ही प्रक्रिया राबविताना या कक्षाच्या जिल्हा व तालुका कक्षातील वाहनचालक महेश शेंडे, पिंकू क्षीरसागर यांची महत्वाची भूमिका आहे. मध्यरात्री २ वाजताच उठून हे वाहनचालक जिल्हास्तरावरील चमूला घेऊन तालुका गाठायचे व तेथून निश्चित केलेल्या गावात किर्रर्र अंधारातच ठाण मांडायचे. या उद्दिष्टपूर्तीत वाहनचालकांचा हा पुढाकार महत्वाचा ठरला.गावे देण्यात आली दत्तक४तालुका हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य प्रशासनाने दिले होते. ते मार्च महिन्याच्या पूर्वी करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला. यात ‘आमचा गाव आमचा विकास’च्या चार्ज अधिकारी व पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांना यांच्या क्षेत्रात येणारी गावे दत्तक दिली. या राष्ट्रीय कार्यात महत्वाचा वाटा पदाधिकाऱ्यांसह ग्रामसेवक, शिक्षक व ग्रामस्थांचा राहिला. हागणदारीमुक्तीची ही संकल्पना गाव विकासासाठी महत्त्वाची ठरणारी आहे. यात अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घेतलेला पुढाकार हा खरोखरच एका चळवळीला साजेसा ठरलेला आहे. प्रत्येकाने गाव, परिसर स्वच्छ ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली अशीच भूमिका हागणदारीमुक्तीचा वारसा टिकवून ठेवण्यात पुढाकार घेण्याची गरज आहे. -कविता बनकर, सभापती, पं.स. तुमसर.स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या माध्यमातून तालुका ओडीएफ नुसार हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले. हागणदारीमुक्तीचा एक प्रकारे बिजारोपण या तालुक्यातून करण्यात आला आहे. हा प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. यापुढे स्वत:ची जबाबदारी समजून सर्वांनी गाव विकासाला साथ द्यावी.-सुधाकर आडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. भंडारा.