मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा रेल्वे प्रशासन करते, परंतु तुमसर टाऊन ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकाला ‘पॅसेंजेर हाल्ट’ (प्रवाशी थांबा) चा दर्जा आहे. येथे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नाही. मे महिन्यातील उन्हात त्यांना ताटकळत रेल्वेची वाट पाहावी लागते. उन्हापासून बचावाकरिता वृक्षाखाली धाव घेतात. एका वर्षात ५० लाखांचा महसूल रेल्वे प्रशासनाला होत असला तरी रेल्वे स्थानकाचा दर्जा केव्हा मिळणार, याची चर्चा आहे.तुमसर रोड तिरोडी या ब्रिटीशकालीन रेल्वे मार्गावर तुमसर टाऊन रेल्वे स्थानक तुमसर शहरात आहे. सदर रेल्वेस्थानकाला पॅसेंजर हाल्ट (प्रवासी थांबा) हा दर्जा रेल्वे प्रशासनाने दिला आहे. रेल्वे स्थानकाचा दर्जा अद्याप प्राप्त झाला नाही. येथे प्रवाशांना बसण्याकरिता खुर्च्या नाही. प्रवाशांना रेल्वे गाडीची वाट भर उन्हात पाहावी लागते. रेल्वे स्थानकावर लहानशे शेड आहे.उर्वरीत रेल्वेस्थानक खुला आहे. उन्हाळ्यात जीवघेण्या उन्हात येथे प्रवाशी उभे राहतात. लहान मुले, वृद्ध स्त्री, पुरुषांना कमालिचा त्रास सहन करावा लागतो.५० लाखांचा महसूलतुमसर टाऊन रेल्वे स्थानकातून रेल्वे प्रशासनाला वार्षिक ५० लाखांचा महसूल प्राप्त होतो. दिवसातून चार प्रवाशी रेल्वेगाड्या येथून धावतात. या रेल्वे स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून शेकडो प्रवासी दररोज येथून ये जा करतात. नागपूर (इतवारी) पर्यंत प्रवाशी रेल्वेगाडी या मार्गाने जाते. त्यामुळे या रेल्वेस्थानकावर नेहमीच गर्दी दिसून येते. पावसाळ्यात, हिवाळ्यातही प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.दर्जा मिळाल्याने काय होईल?पॅसेंजर हॉल्ट (प्रवाशी थांबा) तुमसर टाऊनला आहे. रेल्वे स्थानकाचा दर्जा प्राप्त झाल्यास मूलभूत सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. यात रेल्वे स्थानकावरील शेड, स्वच्छ प्रसाधनगृह, शौचालयाची व्यवस्था, तिकीट विक्री स्वत: रेल्वे प्रशासनाकडून होईल. प्रवाशांना बसण्याची व्यवस्था, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ, इतर सुख सोयींचा त्यात समावेश होईल. पॅसेंजर हॉल्टमुळे रेल्वे प्रशासनही या रेल्वेस्थानकाकडे लक्ष देत नाही.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षतुमसर टाऊन रेल्वे स्थानकाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष दिसत आहे. सदर रेल्वे स्थानक शेवटची घटका मोजत आहे. शहराच्या रेल्वे स्थानकाच्या वाताहतीकडे लक्ष दिले जात नाही. सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेचा प्रवास परवडतो. त्यामुळे रेल्वे स्थानकाचा दर्जा मिळण्याची गरज आहे. तिरोडी मार्गावरील काही रेल्वेस्थानकांना पॅसेंजर हाल्टचा दर्जा आहे.यासंदर्भात रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांना संपर्क साधल्यावर ते बोलायला तयार नाही. हा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याचे त्यांनी सांगितले.
तुमसर टाऊन रेल्वे स्थानक बनला केवळ ‘पॅसेंजर थांबा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:02 PM
प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा रेल्वे प्रशासन करते, परंतु तुमसर टाऊन ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकाला ‘पॅसेंजेर हाल्ट’ (प्रवाशी थांबा) चा दर्जा आहे. येथे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नाही.
ठळक मुद्देवृक्षाखाली प्रवासी करतात प्रतीक्षा : रेल्वे स्थानकाचा दर्जा केव्हा मिळणार? प्रवाशांना बसण्याकरिता खुर्च्या नाही