अभियंत्यांना निवेदन : शिवसेनेची मागणीसाकोली : कृषीपंपाचे भारनियमन तात्काळ बंद करुन शेतीला २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावे, अशी मागणी शिवसेना तालुकातर्फे विजवितरण कंपनीला निवेदनातून करण्यात आली आहे.तालुक्यातील ९० टक्के रोवणी आटोपली असून पाण्यासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र निसर्गाची अवकृपा यावर्षीही शेतकऱ्यांवर दिसत आहे. तर ज्या शेतकऱ्याजवळ विहिरी व बोरवेल आले त्यांना १६ तासांच्या भारनियमनाचा समस्या करावा लागत आहे. १६ तासाचे भारनियमन तात्काळ बंद करुन कृषी पंपाना २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावा अन्यथा शिवसेनेतर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून करण्यात आला आहे.शिष्टमंडळात नरेश करंजेकर, पतीराम नेवारे, मोहन चांदेवार, रामदयाल गजभीये, घनीराम विभागे, विठोबा बोरकर, संजय सोनवाने, चंद्रशेखर चोले, धनराज कापगते, तुकाराम निखारे, पुष्पा सोनकुसरे, अनिता कंटकार, नागेश्वर कांबळे, महेश कांबळे, विश्वनाथ चांदेवार, रवि चांदेवार, बंडू लिचडे, ज्ञानेश्वर कापगते, यशवंत लांजेवार, रमेश बोरकर, मुकेश पंचभाई, मुकेश खंदारे, राकेश येरने, विकास बडोले, राधेशाम पंधरे, राहुल संग्रामे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
भारनियमन बंद करा
By admin | Published: August 15, 2016 12:20 AM