खरबी (नाका) : भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या खराडी येथे शेतकऱ्यांना पावसाळ्या दरम्यान शेतावर जाणाऱ्या खराडी ते मोहाडी ३ कि़मी. रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. स्वर्ग खासदार नामदेवराव दिवटे यांच्या खासदार निधीमधून २० वर्षापुर्वी या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. पण आज हा रस्ता अखेरच्या घटका मोजत आहे.पावसाळा दरम्यान या रस्त्यावर टोंगराभर चिखल उपसत शेतकऱ्यांना शेतावर दररोज जावे लागते. पावसाळा दरम्यान भाजीपालाचे पिके व्यापाऱ्यापर्यंत पोहचविणे रस्ताअभावी कठीण झाले आहे. या रस्त्याने पावसाळा दरम्यान बैलबंडी जाणे बंद पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळापुर्वी शेतावर रासायनिक खत नेवून ठेवावी लागते. या दरम्यान खते चोरी जाते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. मंजुर शेतावर जाण्यासाठी टाळाटाळ करीत असतात. या सर्व बाबीच्या परिणाम शेतकऱ्यांच्या माणसिकतेवर पडत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.या गावामध्ये भाजपा या पक्षाच्या प्रभाव फारपुर्वीपासून आहे. खासदार नानाभाऊ पटोले यांच्या खास आवडता गाव असल्याचे कार्यकर्तेचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा रस्ताकडे खासदार साहेबानी लक्ष देवून शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करावी, अशी येथील भाजपा कार्यकर्ते चैतराम हिवसे, मोहन जली, संजय हिवसे, सरपंच श्रीकृष्ण हिवसे, देवमन गोडबोले, प्रल्हाद हिवसे, सुधाकर धार्मिक, राजु धार्मिक व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे. (वार्ताहर)
खराडी येथे पांदन रस्त्याअभावी शेतकरी अडचणीत
By admin | Published: October 28, 2016 12:31 AM