शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

डोंगरला येथे १२ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:47 AM

विवाहाच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय विकास महामंडळाच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन डोंगरला येथे करण्यात आले. या सोहळ्यात माळी समाजातील एकूण १२ जोडपी विवाहबद्ध झाली.

ठळक मुद्देमाळी समाजाचा उपक्रम : संसारपयोगी साहित्याचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : विवाहाच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय विकास महामंडळाच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन डोंगरला येथे करण्यात आले. या सोहळ्यात माळी समाजातील एकूण १२ जोडपी विवाहबद्ध झाली.तुमसर तालुक्यातील डोंगरला येथील माळी समाज सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला आ.चरण वाघमारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीकांत भुसारी, विजय सहारे, राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, शिक्षण व अर्थ सभापती धनेंद्र तुरकर, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, जि.प. महिला बालकल्याण सभापती रेखा ठाकरे, अ‍ॅड.रविभूषण भुसारी, विठ्ठल कहालकर, लक्ष्मीकांत बानेवार, कुसुमताई कामळे, बंडूभाऊ बनकर, शंकर राऊत, काँग्रेस तालुका अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष नामदेव कामळे, राधेशाम आमकर, कविता बनकर, माजी सभापती पं.स. आदी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सवाचे औचित्य साधून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला.मागील १२ वर्षापासून डोंगरला येथे विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे. विवाह सोहळा सत्यशोधक पद्धतीने पार पाडण्यात आला व तांदळाएवजी पुष्प पाकळ्या अक्षदा म्हणून वरवधूवर वर्षाव करण्याकरिता देण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आधुनिक युगात विवाह पद्धतीवर होणाऱ्या अतोनात खर्चावर सामूहिक विवाह सोहळ्यावर आळा बसविता येतो. या सोहळ्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये नातेसंबंध वृद्धींगत होतात. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्याला समाज बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहकार्य केले.कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या वतीने बाराही जोडप्यांना संसारपयोगी साहित्याचे व ज्योतिबा - सावित्रीच्या फोटोचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला पंचक्रोषीतील माळी बांधव तथा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष नामदेव कामळे, उपाध्यक्ष गणेश राऊत, सचिव शंकर गिरडकर, सहसचिव जोशी नेरकर, कोषाध्यक्ष मुरलीधर बनकर, शंकर राऊत, तुलाराम बागडे, शालीकराम नंदरधने, यादोराव बोरकर, अशोक बनकर, माधोराव गायधने, चैतराम बनकर व लता किरणापुरे सदस्य, ताराचंद कटनकर, राधेशाम आमकर, सेवकराम किरणापुरे, कामळे या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :marriageलग्न