चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील चार गावात नाला लगत शेत शिवारात पुलाचे बांधकाम करण्यासाठी तिरोडा उपसा सिंचन प्रकल्पाने सर्व्हेक्षण केलेले आहे. अडीच कोटींचा कृती आराखडा असताना निधी अभावी ही प्रक्रिया खोळंबली आहे. यामुळे शेत शिवारात ये जा करताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. सिहोरा परिसरातील वैनगंगा नदी काठालगत असलेल्या चुल्हाड, देवरी (देव), गोंडीटोला, सुकळी (नकुल), बपेरा, देवसर्रा गावातील शेत शिवारात नाले नदीला जोडणारी आहेत. कवलेवाडा धरणात पाणी अडविण्यात आल्याने नाले पाण्याने तुंबली आहेत. या नाल्यात पाच-सहा फुट पाणी आहे. यामुळे नाल्यातून शेत शिवारात ये जा करताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. एकट्या देवरी (देव) गावात ५० हेक्टर आर हून अधिक शेती खरिप आणि रब्बी हंगामात उत्पादन घेताना प्रभावित ठरत आहे. अन्य गावात हीच स्थिती आहे. या गावांच्या नदी काठालगत शेतशिवारात तिरोडा उपसा सिंचन प्रकल्पाने पुल बांधकामाचे सर्व्हेक्षण केले आहे. त्या प्रमाणे ग्रामसभेतून ग्रामपंचायतीनी ठराव दिलेला आहे. जानेवारी २०१४ मध्ये पुल बांधकाम आणि मंजुरीचा अंदाज पत्रक तयार करण्यात आलेले आहे. यात ७० लक्ष खर्चाचे एक पूल तथा प्रत्येकी १० लक्ष खर्चाचे पाच पूल असे नियोजन आखण्यात आले आहे. अन्य गावातील शेत शिवारात सव्वा कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहेत. या अंदाजपत्रकांना तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात या योजनेची सूत्र हलविण्यात येत आहेत. यामुळे या परिसरात शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी भंडारा जिल्हा प्रशासनाची नाही. स्थानिक जिल्हा प्रशासन दलात निर्माण करू शकतो. तिरोडा तालुक्यातील अदानी वीज प्रकल्प आणि धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी कवलेवाडा मांडवी गावानजीक धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणात पाणी अडविण्यात आल्याने सिहोरा परिसरातील शेती प्रभावित झाली आहे. नालालगत असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात आलेला असून ५०० मीटर अंतरपर्यंत बांधकाम करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. परंतु निर्धारित अंतरपेक्षा लांब असणाऱ्या शेतकऱ्यांना कसलीही मदत देण्यात आली नाही. या शेतकऱ्यांची शेती बुडीत नसल्याने आर्थिक मदतीकरिता ओरड नाही. परंतु आता हेच शेतकरी अडचणीत आलेली आहे. नाला ओलांडून शेत शिवारात ये जा करताना कसरत होत आहे. दरम्यान धरण बांधकामात अदानी वीज प्रकल्पाने निधीची गुंतवणूक केली होती. या प्रकल्पाला पाण्याची गरज असल्याने ही गुंतवणूक केली होती. परंतु धरण पूर्ण होताच अन्य बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. धरणामुळे शेती प्रभावित होत आहे. परंतु पूल बांधकामाची समस्या निकाली काढण्यात येत नाही. (वार्ताहर)
चार गावात अडीच कोटीची कामे रखडली
By admin | Published: December 31, 2014 11:19 PM