भंडारा : पवनी येथून तीन किमी अंतरावर असलेल्या नागपूर रोडवरील वाही जलशायजवळ भिवापूर कडून येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसली. यात एक युवक ठार झाला तर, दोघे जण गनभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. जखमींवर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव बबलू मोरेश्वर येवले (२०, तास कॉलोनी भिवापूर, जिल्हा नागपूर) असे असून जखमी मध्ये चेतन सुनिल दुपारे (२०, तास कॉलोनी भिवापूर), महेश विनायक मेंढे (आसगाव, ता. पवनी जिल्हा भंडारा) यांचा समावेश आहे. बबलू व जखमी हे एका दुचाकीवरून भिवापूरकडून पवनी येथे कार्यक्रमात डीजे वाजविण्याकरिता जात होते. तर, महेश हा पवनी कडून नीलज कडे जात होता. नीलजकडून भंडाराकडे जात असलेल्या काही युवकांनी अपघात झाल्याचे पाहून तिन्ही जखमींना पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले, परंतु बबलू याने रुग्णालयाच्या दारात प्राण सोडला. घटनेची माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास पवनी पोलिस करीत आहेत.