लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून लक्षावधी रूपयांचा निधी खर्चून गत दोन महिन्यापुर्वी करण्यात आलेल्या बंधारे दुरुस्ती कामात प्रचंड गैरव्यवहार करुन निकृष्ट बांधकाम झाल्याने अवघ्या दोन महिन्यात दोन सिमेंट बंधारे फुटल्याची घटना उघडकीस आली. सदर घटना तालुक्यातील परसोडी (नाग) येथे उघडकीस आली. यात शेतकऱ्यांचे जवळपास २५ एकरातील धान शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे लघु पाटबंधारे उपविभागाला गैरव्यवहाराचे ग्रहण लागल्याची सर्वत्र चर्चा आहे.जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे उपविभाग साकोली अंतर्गत गत दोन महिन्यापूर्वी दोन कोल्हापुरी सिमेंट बंधारा दुरुस्ती काम करण्यात आले. सदर काम लाखांदूर तालुक्यातील परसोडी-नाग-आथली या ओढ्यावर शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. या दुरुस्ती कामासाठी शासनाने प्रत्यकी सुमारे १२ लक्ष १८ हजार ४६१ रूपयांचा निधी मंजुर केला. मात्र सदर दुरुस्ती कामात अभियंता व कंत्राटदाराने संगनमताने प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करीत अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे बांधकाम कल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.सदर दुरुस्ती कामात हयगय करीत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने या बंधाऱ्याच्या तटबंदीचे संपूर्ण दगड ओढ्यातील पुराच्या पाण्याने वाहुन गेल्याचे आढळून आले. या घटनेत बंधाऱ्याच्या दोन्ही कडा फुटून पुराचे पाणी लागवडीखालील धान शेतीत शिरल्याने परसोडी येथील १०-१५ शेतकऱ्यांचे जवळपास २५ एकरातील धान पिक नष्ट झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपविभागाला जबाबदार धरुन नुकसान भरपाईची मागणी मागणी केली आहे.ओढ्यातील पुराचे पाणी ठरले कारणीभूतऐन पावसाळ्याच्या दिवसात घाईघाईने उरकवण्यात आलेल्या या दूरुस्ती कामात लघु पाटबंधारे प्रशासनाकडून हेतुपुरस्पर हयगय व अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. अवघ्या दोन महिन्यातच दोन्ही बंधारे फुटून जवळपास २५ एकरातील धान शेतीचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, बंधारे दुरुस्ती काम होतांना ओढ्याचे दुतर्फा खोदकाम व सरळीकरण करतांना दगडाची अत्यंत निकृष्ट तटबंदी करण्यात अआली ओढ्यातील पुराच्या पाण्याने दोन्ही बंधारे फुटल्याचे वास्तव आहे.
दोन महिन्यांमध्ये दोन सिमेंट बंधारे फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 5:00 AM
सदर काम लाखांदूर तालुक्यातील परसोडी-नाग-आथली या ओढ्यावर शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आले. या दुरुस्ती कामासाठी शासनाने प्रत्यकी सुमारे १२ लक्ष १८ हजार ४६१ रूपयांचा निधी मंजुर केला. मात्र सदर दुरुस्ती कामात अभियंता व कंत्राटदाराने संगनमताने प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करीत अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे बांधकाम कल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.
ठळक मुद्देपरसोडी येथील घटना : २५ एकरातील धान शेतीचे नुकसान