शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

पावणेतीन कोटींच्या धान घोटाळ्यात १५ जणांवर गुन्हा; दोन ग्रेडरवर अटकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 4:31 PM

आंबागड येथील प्रकरण

तुमसर (भंडारा) : नाकाडोंगरी येथील धान खरेदी केंद्रात सुमारे चार कोटींचा अपहार झाल्याची शाई वाळत नाही तोच तुमसर तालुक्यातील आंबागड येथे आधारभूत धान खरेदी केंद्रात दोन कोटी ७१ लाख ३४ हजार रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली. जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी आंधळगाव पोलिस ठाण्यात संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एकूण १५ जणांचा समावेश असून दोन ग्रेडर यांना अटक करण्यात आली आहे.

अरविंद भगवान दास भुतांगे व स्वप्निल राजेश शामकुवर दोन्ही रा. आंबागड अशी अटक केलेल्या ग्रेडर यांची नावे आहेत. अन्य जणांवर गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये राधेशाम तोलाजी रहांगडाले (अध्यक्ष), संचालक म्हणून गोपीचंद कवळू बावनकर, सुधीर चंदुलाल ठाकरे, संजय फत्तु कावळे, निलकंठ रतिराम मोरे, घनशाम झागडुसाव जांभुळपाने, राजेश सुखराम शामकुवर, नंदलाल डोमाजी रहांगडाले, बुधराज पंढरी पटले, श्रीपत अंतु कोकोडे, गणेश उदेसिंग पंचरे, रत्नमाला भगवान भुतांगे, सचिव अनिल तोलाजी रहांगडाले तर ग्रेडर अरविंद भगवानदास भुतांगे व स्वप्नील राजेश शामकुवर यांचा समावेश आहे.

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आंबागड, ता. तुमसर या नावाने असलेल्या संस्थेमध्ये असलेल्या १५ जणांनी संगनमत करून आंबागड येथे धान खरेदी केंद्र असलेल्या धान खरेदी हंगाम सन २०२१-२०२२ मध्ये खरीप हंगामाचे प्रत्यक्ष धान खरेदी न करता धान खरेदी केल्याचे खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची व मार्केटिंग फेडरेशन व शेतकऱ्याची दोन कोटी ७१ लाख ३४ हजार ४३८ रुपयांचा अपहार करून फसवणूक केली. जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी आंधळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी १५ जणांविरुद्ध भादंविच्या ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन राजकुमार करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीfraudधोकेबाजीFarmerशेतकरीbhandara-acभंडाराCrime Newsगुन्हेगारी