वरठी परिसरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सोमवारी रात्रीपासून अतिवृष्टी सुरू असून, मंगळवारी पहाटे पावसाची जोरदार सर बरसली. त्यात सुभाष वाॅर्डातील विष्णू कोर्वेकर यांच्या दुमजली घराची सकाळी अचानक घराची भिंत कोसळली. ही भिंत रस्त्यावर उभ्या असलेल्या अंजना नाईक यांच्या कारवर पडली. यात त्यांच्या कारचा अक्षरश: चुराडा झाला. हा रस्ता रहदारीचा आहे. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर कुणी नसल्याने मोठी घटना टळली, तसेच प्रदीप आनंदराव लोहाबरे व विठाबाई क्षीरसागर यांच्या घराचे छत कोसळले. दरम्यान, घरी कुणी नसल्याने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य संजय मिरासे यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित कार्यालयाला सूचना दिली. तत्काळ पंचनामा करून शासकीय लाभ देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
070921\img_20210907_101020.jpg
संततधार पावसाने रस्त्यावर पडलेली भिंत व कार