गुन्हा दाखल : पिंपळगाव, भंडारा येथील घटनाभंडारा : दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले. पहिली घटना पिंपळगाव-मोगरा मार्गावर तर दुसरी घटना भंडारा येथील त्रिमुर्ती चौकात घडली. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव-मोगरा मार्गावर दोन दुचाकींची आमोरा-सामोर धडक झाली. यात दोन्ही दूचाकीस्वार जखमी झाले. लाखनी पोलिसांनी दोन्ही दूचाकीस्वारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार सारवे करीत आहेत. दुसऱ्या घटनेत दूचाकीस्वाराला दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने एकजण जखमी झाला. ही घटना काल मंगळवारी सांयकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्रिमुर्ती चौकात घडली. सदर व्यक्ती एम एच ३६ एस २०४८ ने जात असताना ही घटना घडली. वैद्यकिय अहवाल व जखमीच्या बयाणावरुन पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. तपास पोलीस हवालदार भोगे करीत आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या संख्येत दिवसेंगणीक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वाहन निष्काळजीपणाने चालविल्यामुळे सदर अपघात घडत आहे. (प्रतिनिधी)कत्तलीसाठी नेणारी जनावरे पकडलीभंडारा : जनावरांना कत्तलीसाठी नेत असलेल्या एका मालवाहू वाहनाला अडवून २४ जनावरे पकडण्यात आली. ही कारवाई काल मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वरठी पोलीस ठाणे अंतर्गत करण्यात आली. तीन वाहनांमधून जवळपास २४ म्हशी नेण्यात येत होती. चंद्रशेखर बनकर रा. वरठी यांच्या तक्रारीवरुन वरठी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. पकडलेल्या जनावरांची किंमत ४ लक्ष ८० हजार रुपये सांगण्यात येते. तपास सहायक फौजदार गभणे करीत आहेत.
दोन अपघातात तीन जखमी
By admin | Published: November 19, 2015 12:20 AM