रविवार ठरला ‘घातवार’ : परीक्षेला जाणाऱ्या युवकाचा समावेशतुमसर : स्पर्धा परिक्षेकरिता जाणाऱ्या एका युवकाचा तोल गेल्याने त्याचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना तुमसर रोड शिवारात सुकळी गेटसमोर रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. विश्वेश्वर वसंता कनोजे (२४) रा. केसलवाडा (तिरोडा) असे मृत युवकाचे नाव आहे. दुसरा अपघात तुमसर-तिरोडी रेल्वेमार्गावर शिवनी गावाजवळ घडला. ज्यात एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली.विश्वेश्वर कनोजे रविवारी महाराष्ट्र एक्सप्रेस गाडीने नागपूर येथे आॅर्डिनन्स फॅक्टरीत परीक्षा देण्याकरिता जात होता. तुमसर रोड शिवारात सुकळी फाटकाजवळ त्याचा तोल गेला. रेल्वे ट्रॅकमध्ये पडल्याने त्याचे मानेपासून धड वेगळे झाले. घटनास्थळीच तो गतप्राण झाला. हा अपघात सकाळी ९.३० वाजता घडलाी. अपमार्गावरुन त्यानंरत सहा ते सात रेल्वेगाड्या त्याच्या मृतदेहावरुन रवाना झाल्या. सुमारे दीड तास युवकाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडून होता. या घटनेची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली.दुसरा अपघात तुमसर रोड -तिरोडी रेल्वे ट्रॅकवर शिवनी (तुमसर) फाटकाजवळ घडला. एक अनोळखी इसम (४५) रेल्वे ट्रॅकशेजारी मृत्यूमुखी पडला होता. प्रवासी रेल्वे गाडी चालकाने याची माहिती तुमसर रोड रेल्वे स्टेशन अधीक्षकांना दिली. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. प्रवाशी रेल्वेगाडीत प्रचंड गर्दी आहे. सर्वसाधारण डब्ब्यात पाय ठेवण्यात जागा मिळत नाही. रविवारी घडलेला अपघाताला जबाबदार गर्दीच आहे. विश्वेश्वर कनोजे दारावर उभा होता.धक्क्याने तो खाली पडला व हा अपघात घडला, असे प्रत्यक्षदर्र्शींनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने प्रवासी रेल्वेगाडीत अतिरिक्त डब्बे लावण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
रेल्वे अपघातात दोन ठार
By admin | Published: March 27, 2017 12:28 AM