भावड येथील घटना : दोन जण अटकेतलोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : भावड येथील देशी दारुचे दुकानातून चारचाकी वाहनातून अवैधपणे दारुची वाहतूक करीत असताना अड्याळ पोलिसांनी २ लक्ष रुपयांची साहित्यासह आरोपींना अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथील दिपशांत श्रीराम खोब्रागडे (२९) व चेतन पुरुषोत्तम मेंढे (२३) अशी अटक केलेल्या इसमांची नावे आहेत. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. शासनाने राष्ट्रीय मार्गावरील दारू दुकाने हटविल्याने ग्रामीण भागातील देशी दारु दुकानांना जत्रेचे रुप आले आहे. तालुक्यातील भावड येथील देशी दारु दुकानातून अवैध वाहतूक चंद्रपूर जिल्ह्यात होत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. कित्येकदा व साहित्य जप्त करूनही हा व्यवसाय सर्रासपणे सुरु आहे. भावड ते बेलाटी मार्गावरील देशी भावड येथील देशी दारु दुकानातून चंद्रपूर जिल्ह्यात सर्रास दारु नेली जात आहे. बुधवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास अड्याळ पोलिसांना भावड येथील देशी दारु दुकानातून दारुची अवैध तस्करी होत असल्याची कुजबूज लागताच सापळा रचला. यात भावड रनाळा टी पॉर्इंटवर एमएच ३१ बीबी ९४४१ या चारचाकी भावड येथील दारुच्या दुकानातून देशी दारूचे ३४ खोके जप्त केले. या कारवाईत ४५ हजार रुपयांची दारु व १ लक्ष ८५ हजार रुपये किमतीचे वाहन असे २.३० लक्ष रुपयांचे साहित्य जप्त केले.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही दारु पवनी येथील शिन्नू कोलावार यांच्या देशी दारुचे दुकानात विक्रीकरतिा नेत असल्याचे पकडलेल्या इसमांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील इसम हे पवनी येथील दारु विक्रेत्याचे नाव सांगत असून या अवैध धंद्यात शिन्नू हा मुख्य सुत्रधार असल्याचे बोलले जात आहे. शिन्नूला लवकरच अटक करणार असल्याचे पोलिस उपनिरिक्षक शरद गिऱ्हेपुंजे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तपास अड्याळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक एस.एन. ढोबळे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.
साहित्यासह २ लाखांची दारू जप्त
By admin | Published: July 06, 2017 12:30 AM