संबंधित विभाग झोपेत : खराशी दिघोरी मार्गावरील वळणखराशी : खराशी ते दिघोरी या सहा किलोमिटरच्या अंतरात तिन नागमोडी वळण आहेत. चुलबंद नदी जवळच खुनारी फाट्यालगतचे वळण हे अपघात केंद्र असुन या वळणावरील अपघात नेहमीचाच विषय बनला आहे. या वळणावर आठ दिवसात दोन ट्रम उलटल्याच्या घटना घडल्या. वळणावर आतापर्यंत १०-१२ वाहनांचा अपघात झाला असून सात ते आठ लोकांना जीव गमवावा लागला. यापुर्वी साखर, तेल, रेती, टमाटर घेऊन जाणाऱ्या ट्रकांचा अपघात या वळणावर झाला. या नागमोळी वळणावर अनेकदा अपघात होवूनही तो रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. चुलबंद नदीजवळील वळण भयंकर स्वरुपाचे असुनही दिशादर्शक, सुचना फलक किंवा गतिरोधकसारखी उपाययोजना संबंधित विभागाने केली नाही. रात्रीच्या वेळी या मार्गावर पहिल्यांदाच वाहन चालवणाऱ्यांनी या वळणाचा अंदाज बांधता येत नाही आणि त्यामुळे अनेक वाहन उलटतात तर कधी अपघातही होतात. ट्रक उलटने, अपघात होणे जीव जाणे या गोष्टी या वळणावर वारंवार होत असतांना या समस्येवर लक्ष केंद्रीत करुन उपाययोजना करतांना कोणीही दिसत नाही. आठवडाभरात दोन ट्रक उलटले तर यापूर्वी १० ते १२ अपघात झाले. एवढे धोकादायक स्थळ असतांना संबंधित विभाग कोणतीही उपाययोजना करत नसल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
आठवड्याभरात दोन ट्रक उलटले
By admin | Published: February 03, 2016 12:39 AM