लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दूचाकी चोरांचा हैदास वाढला असतांना स्थानिक गुन्हे शाखेला दोन अट्टल दुचाकी चोरांना पकडण्यात यश आले आहे. यात या चोरट्यांकडून आठपैकी पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अलंकार उर्फ मोंटू मनिराम मिश्रा रा. नागपूर व रोहित नंदकूमार कुडेगावे रा. सानगडी अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी घडलेल्या दुचाकी चोरी प्रकरणाचा तपास सुरु आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांना तपासाचे निर्देश दिले होते. यात मानकार यांनी विशेष पथक तयार करुन उपरोक्त दोन्ही अट्टल गुन्हेगार यांचा शोध लावला. मिश्रा हा नागपूर येथील लक्कडगंज परिसरात असल्याची विश्वसनिय माहिती मिळाली. पोलिसांनी सापडा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखविताच त्याने भंडारा व नागपूर येथे एकूण आठ दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली. यावेळी त्याचा साथीदार म्हणून सानगडी येथील रोहित कुडेगावे याने मदत केली. यानंतर कुडेगावे यालाही अटक करण्यात आली. पोलिसानी दोघांच्या ताब्यातून पाच मोटार सायकली जप्त केल्या आहेत.या कारवाईत पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, सहायक पोलीस निरीक्षक गणेश काळे, पोलीस उपनिरीक्षक गदादे, सहा. फौजदार प्रितीलाल रहांगडाले, पोलीस हवालदार वामन ठाकरे, पोलीस नायक रोशन गजभिये, शिपाई चेतन पोटे, कौशीक गजभिये यानी सहभाग घेतला.
दुचाकी चोर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 12:40 AM
जिल्ह्यात दूचाकी चोरांचा हैदास वाढला असतांना स्थानिक गुन्हे शाखेला दोन अट्टल दुचाकी चोरांना पकडण्यात यश आले आहे. यात या चोरट्यांकडून आठपैकी पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अलंकार उर्फ मोंटू मनिराम मिश्रा रा. नागपूर व रोहित नंदकूमार कुडेगावे रा. सानगडी अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
ठळक मुद्देपाच दूचाकी जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई