शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पोस्टमन तरूणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:55 PM

लग्न जुळल्यानंतर भावी आयुष्याचे स्वप्न रंगविणाऱ्या एका पोस्टमन तरूणीला भरधाव ट्रकने जागीच ठार केले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहरात रविवारी सायंकाळी घडली. फेब्रुवारी महिन्यात आयोजित साक्षगंधाच्या तयारीला असलेल्या परिवाराला अंतयात्रेची तयारी करावी लागली.

ठळक मुद्देबेला गावावर शोककळा : बोहल्यावर चढण्याआधी काळाचा घाला

लोकमत न्यूज नेटवर्कबेला : लग्न जुळल्यानंतर भावी आयुष्याचे स्वप्न रंगविणाऱ्या एका पोस्टमन तरूणीला भरधाव ट्रकने जागीच ठार केले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहरात रविवारी सायंकाळी घडली. फेब्रुवारी महिन्यात आयोजित साक्षगंधाच्या तयारीला असलेल्या परिवाराला अंतयात्रेची तयारी करावी लागली.पल्लवी विजय भोयर (२२) रा. बेला असे मृत तरूणीचे नाव आहे. ती तिरोडा तालुक्यातील अर्जुनी येथे पोस्टमन पदावर कार्यरत होती. गत महिन्यात तिचे लग्न जुळले होते. १० फेब्रुवारीला तिचे साक्षगंध ठरले होते. संपूर्ण परिवार या कार्यक्रमाच्या तयारीत होता. अशातच काही कामानिमित्ताने पल्लवी भंडारा येथे आली होती. रविवारी सायंकाळी परत जाताना राष्ट्रीय महामार्गावरील पटवारी भवनजवळ मागून आलेल्या ट्रकने (क्रमांक एमएच ३१ सीबी २३९०) तिच्या स्कुटीला जबर धडक दिली. त्यात तिच्या डोक्याला जबर दुखापत होवून जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती होताच बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. ट्रक चालक स्वत:हून पोलीस ठाण्यात दाखल झाला. या अपघाताची माहिती बेला येथे धडकताच तिच्या परिवाराचा आक्रोश आसमंत भेदणारा होता. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. तिच्या मागे आई, वडिल व एक भाऊ आहे. पल्लवीचे बीएससी पर्यंत शिक्षण झाले असून तिचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. तिच्या मृत्युने हळहळ व्यक्त होत आहे.