७७० वन्य प्राण्यांची नोंद : ४० टक्क्यांनी वाढलोकमत न्यूज नेटवर्कपवनी : बुद्ध पोर्णिमेला उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रात करण्यात आलेल्या वन्यप्राणी गणनेत मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी ४० टक्के वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. पवनी वनपरिक्षेत्रात, उमरेड व कुही पेक्षा सर्वात जास्त वन्यप्राण्यांची गणना झाली आहे. पवनी येथे यावर्षी ७७० वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. पवनी वन्यप्राणी व वनपरिक्षेत्रात १७ पानवठ्यावरील १७ मचानीवर २२ प्रगणकांनी वन्यप्राणी गणना केली. यावर्षी या गणनेमध्ये पाच वाघ, आठ रानकुत्रे, तीन अस्वले, ४९ रानगवे, १३८ चितळ, ४२ सांबर, २४ चौसिंगे, १०५ निलगाय, १९८ रानडुक्कर असे एकूण ७७० वन्यप्राणी आढळून आले. मागच्या वर्षीच्या वन्यप्राणी गणनेत वाघ ०, बिबट दोन, रानकुत्रे चार, रानगवे ५५२ वन्यप्राणी आढळून आले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४० टक्क्यांनी वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.यावर्षी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी वनपरिक्षेत्रात सर्वात जास्त ७७०, उमरेड वनपरिक्षेत्रात ६४२ व कुही वनपरिक्षेत्रात ३४१ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. मचानावरील प्रगणनेस कोणताही वैज्ञानिक आधार नसून हा पारंपारिकरित्या घेण्यात येणारा प्रगणना कार्यक्रम आहे. यामध्ये काही त्रृट्याही राहू शकतात पण यावर्षी पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांची वाढलेली संख्या सुखावणारी आहे. ही वन्यप्राणी गणना यशस्वी करण्याकरीता विभागयी वनअधिकारी एस.बी. भलावी, पवनी वन्यजीव वनक्षेत्राधिकारी दादा राऊत, उमरेडचे विभागीय वनअधिकारी आर.एच. पोटरंग, वनपाल डी.टी. नंदेश्वर, विपीन तलमले व सर्व वनकर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य घेतले.
उमरेड-करांडला अभयारण्याच्या पवनी वनक्षेत्रात सर्वात जास्त वन्यप्राणी
By admin | Published: May 14, 2017 12:22 AM