शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
4
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
5
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
6
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
7
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
8
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
9
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
10
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
11
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
12
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
13
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
14
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
15
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
16
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
17
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
18
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
19
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
20
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 

बेशिस्त बाजार!

By admin | Published: June 08, 2015 1:01 AM

प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या भंडारा शहराची लोकसंख्या सव्वा लाखांवर गेली आहे.

प्रशांत देसाई / देवानंद नंदेश्वर भंडाराप्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या भंडारा शहराची लोकसंख्या सव्वा लाखांवर गेली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच चहुबाजूंनी विस्तार होत असल्याने लोकांची गरज म्हणून शहराच्या विविध भागात नवेनवे अनधिकृत आठवडी व दैनंदिन बाजार भरतात. यामुळे नागरिकांची सुविधा होत असली तरी, रस्त्यांवर भरणाऱ्या अनधिकृत बाजारांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. अशा बेशिस्त बाजारांना शिस्त कोण लावणार ? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर भरणाऱ्या अनधिकृत बाजारांमुळे वाहतुकीला अडथला निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. बाजार संपल्यानंतर सफाई होत नसल्याने बहुतांश ठिकाणी सडका भाजीपाला दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पडून राहतो. मटण विक्रेते घाण उघड्यावर फेकून देतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. फेकलेला भाजीपाला खाण्यासाठी मोकाट जनावरांची गर्दी जमते. सोयीसाठी भरविल्या जाणाऱ्या या बाजारांमुळे नागरिकांची गैरसोय होते. नगरपालिकेचे याकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. नागरिकांची बाजाराची गरज व अनधिकृ त बाजारांमुळे होणारी गैरसोय विचारात घेता नगरपालिकेने संबंधित रस्त्यांवरील अनाधिकृत बाजार मैदानांमध्ये स्थानांतरित करण्याची गरज आहे. शहरात अधिकृत एकच आठवडी बाजार व सहा ठिकाणी दैनिक बाजार आहेत. हे सर्व बाजार भरत असले तरी ते अनधिकृत असल्याची माहिती आहे. यामुळे शहरातील दळणवळण व्यवस्थेवर परिणाम पडत आहे.