शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

बांबूपासून साकारली अनन्यसाधारण कला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:41 PM

एखाद्याच्या अंगी जन्मजात असलेली कला त्याला उच्चपातळीवर घेवून जाते. परंतु त्याला छंदाची जोड मिळाली तर ती कला अनन्यसाधारण ठरते. असाच प्रत्यय तथा हुरहुन्नरी छंद जोपासणाऱ्या देवेंद्र निलकंठ आकरे यांनी बांबूपासून निर्मित केलेल्या वस्तु बघीतल्या नंतर आला.

ठळक मुद्देहुरहुन्नरी छंद : वस्तुंचा संग्रह प्रशंसनीय

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एखाद्याच्या अंगी जन्मजात असलेली कला त्याला उच्चपातळीवर घेवून जाते. परंतु त्याला छंदाची जोड मिळाली तर ती कला अनन्यसाधारण ठरते. असाच प्रत्यय तथा हुरहुन्नरी छंद जोपासणाऱ्या देवेंद्र निलकंठ आकरे यांनी बांबूपासून निर्मित केलेल्या वस्तु बघीतल्या नंतर आला.देवेंद्र आकरे हे भंडारा शहरातील सहकार नगर येथील रहिवासी असून बालपणापासूनच त्यांना निसर्ग निर्मित साहित्यांची ओढ होती. आपणही काही करु शकतो या भावनेनी त्यांनी प्रथम चित्रकला, सुंदर हस्ताक्षर या माध्यमातून कला अविष्काराला जन्म दिला. हळूहळू निसर्गत: मिळालेल्या उपजत गुणांना विकसित करत देवेंद्र यांनी बांबूपासून विविध वस्तु बनविण्याला प्रारंभ केला.विशेष म्हणजे टाकावू पासून टिकावु वस्तु व तेवढ्याच निसर्ग निर्मित कशा बनविता येईल यावर त्यांनी बारकाईने लक्ष दिले. आजघडीला त्यांनी बांबूपासून विविध कलात्मक वस्तु बनविल्या असून ते त्यांच्या संग्रहात आहेत. बांबूपासून निर्मित वस्तुंमध्ये ट्रे, वाटी, चमचा, लाईट लॅम्प, पेनबॉक्स, जहाज, घर, हळदकुंकू करंडा, यासह अनेक वस्तुंचा समावेश आहे. वस्तु बनविण्यासाठी निसर्गापासून प्राप्त वस्तुंचा ते वापर करीत असतात. अर्थातच यासाठी त्यांना कुटूंब व मित्रांचीही मोठी मदत तथा प्रेरणा मिळत असते.