‘जॉय आॅफ गिव्हींग’चा उपक्रम : शाळेचा पहिला दिवस आनंदाचा भंडारा : ‘तिन्ही जगाचा स्वामी आईविना भिकारी, असे म्हटल्या जाते. मात्र या जगात कुणाचा कुणीही नसला तरी त्याच्या पाठीमागे स्व:त ईश्वर असतो, असे म्हटले जाते. याची तंतोतंत प्रचिती आज निरागस अनाथ बालकांच्या चेहऱ्यावरील आंनदाला पाहून आली. औचित्य होते, अनाथ बालकांना गणवेश वाटपाचे. यात ६० बालकांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. उद्यापासून (२७ जून) शाळेचा पहिला टोला वाजणार आहे, त्या पार्श्वभूमीवर शहरातील ‘जॉय आॅफ गिव्हींग’ या सामाजिक संस्थेने मुस्लिम लॉयब्ररी चौकात असलेल्या बापू बालकाश्रमातील ६० बालकांना नि:शुल्क गणवेशाचे वाटप केले. शासनाच्यावतीने बालकांना गणवेश दिले जातात, परंतु प्रत्येकच बालकाला शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळतील याची शाश्वती नाही. याशिवाय बालकांनी पहिल्या दिवशी स्वच्छ व नवीन गणवेशात शाळेत दाखल व्हावे, या उदात्त हेतूने ‘जॉय आॅफ गिव्हींग’ने गणवेश वाटपासाठी पुढाकार घेतला. यात भाजपचे वरिष्ठ नेते मुकेश थानथराटे यांच्यावतीने मुलांना गणवेश देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष मो. तारिक कुरैशी, रामकुमार गजभिये, चंद्रशेखर रोकडे, नितीन दुरगकर आशु गोंडाणे, आबिद सिद्धीकी, साधना त्रिवेदी, अरूण भेदे, भुपेश तलमले, किशोर ठाकरे, अतुल मानकर, विकास मदनकर यांच्यासह ‘जॉय आॅफ गिव्हींग’चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी अनाथालयातील निरागस बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. (प्रतिनिधी)
६० अनाथ बालकांना गणवेशाचे वाटप
By admin | Published: June 27, 2016 12:44 AM