२७८ कामगारांना थकीत वेतन मिळणार : व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधीत करारमोहन भोयर तुमसर मागील १२ वर्षापासून बंद पडलेला युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कंपनी व्यवस्थापन तथा कामगार प्रतिनिधींच्या नागपूर येथील बैठकीत प्रथमच सकारात्मक तोडगा काढण्यात आला. कंपनी व्यस्थापन व कामगार प्रतिनिधींनी करारनामा केला. येत्या सहा महिन्यात कारखान्याचा एक युनिट सुरू होणार आहे. त्यानंतर दुसरा युनिट सुरु करण्यात येणार आहे. कारखाना सुरू करण्याकरिता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी आंदोलन केले होते.तुमसरजवळील मॅग्नीज शुध्द करणारा युनिव्हर्सल फेरो कारखाना आहे. सन २००५ मध्ये हा कारखाना कंपनी व्यवस्थापनाने बंद केला होता. या कारखान्यावर वीज वितरण कंपनीचे (पुर्वीचे वीज महामंडळ) सुमारे २५० कोटी वीज बीलापोटी थकीत होते. नंतर हा कारखाना आजारी कारखान्याच्या यादीत गेला. काही कामगारांनी येथे स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. काही कामगारांनी न्यायालयीन लढा सुरुच ठेवला. येथे २७८ कामगारांचे स्वेच्छानिवृत्ती, वेतन तथा इतर देणी थकीत होते. या सर्व कामागारांना त्यांचे हक्काची देणी देण्याबाबत नागपूर येथे दोन दिवसापूर्वी कंपनी व्यवस्थापनाबरोबर बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. काही कामगारांनी विरोध दर्शविला आहे.कपंनी व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधीमध्ये करारनामा करण्यात आला. यात २७८ कामगारांना नियमानुसार ६ लाख ५० हजार ते ९ लाखापर्यंत थकित देण्याचे ठरले. जुन्या कामगारांना कारखान्यात पूर्ववत कामावर घेण्यात येईल. उच्च न्यायालयात कामगारांची याचिका प्रलंबित आहे ती मागे घेण्यात येईल असे करारनाम्यात नमूद आहे.मे महिन्यापासून कामगारांना त्यांची कठीण रक्कमेची किस्त मिळणे सुरू करण्यात येणार आहे. कारखान्यातील कच्चा मालाची वसुली झाल्यानंतर पुढील सहा ते सात महिन्यात सर्व कामगारांना पूर्ण रक्कम कंपनी मालक देणार आहे. प्रथम कारखान्याची दुरूस्ती करून सहा महिन्यात एक युनिट सुरु करण्यात येणार आहे. नंतर दुसरा युनिट येथे सुरु करण्यात येईल. टप्प्याटप्याने हा कारखाना पूर्ववत सुरू होणार आहे. काही कामगारांना करारनामा मंजूर नाही. पंरतु त्यांचे सुध्दा समाधान कंपनी व्यवस्थापन करेल अशी ग्वाही कंपनी व्यवस्थापनाने दिली. कंपनी व्यवस्थापनाने नाराज कामगारांनी किमान पर्याय सोडण्याची विनंती केली. या कारखान्याला राज्य शासनाने अभय योजनेंतर्गत काही वीज बिल माफ केले होते. यात कारखाना मार्च महिन्यात कारखाना सुरू करण्याची होती.कपंनी व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधींच्या बैठकीत राजकीय नेत्यांना दूर ठेवण्यात आले होते. यापूर्वी कारखाना सुरु करण्याकरिता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात येथे आंदोलन करण्यात आले होते. कंपनी व्यवस्थापन तथा कामगार प्रतिनिधींच्या बैठकीत मध्यस्थी म्हणून योगेश सिंगनजुडे हे उपस्थित होते.
युनिव्हर्सल कारखाना सुरु होणार
By admin | Published: March 30, 2017 12:25 AM