चिखला खाणीकडे जाणारा रेल्वेमार्ग, शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यातमोहन भोयर तुमसरगोबरवाही-चांदपूरकडे जाणाऱ्या उपआंतरराज्यीय मार्गावर सीतासावंगी येथे मानवविरहीत रेल्वे फाटक आहे. ब्रिटीशकालीन जगप्रसिध्द चिखला मॅग्नीज खाणीकडे जाणारा हा रेल्वे ट्रॅक आहे. या मार्गावरुन माल वाहतूक गाडया धावतात. अतिशय वर्दळीचा हा राज्यमार्ग आहे. मानविरहीत फाटकामुळे ग्रामस्थ तथा शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आहे.गोबरवाही, चिखला, सीतासांवगी व चांदपूर मार्गे सिहोरा, वाराशिवनी असा हा उपआंतरराज्यीय मार्ग आहे. सीतासावंगी येथे या राज्य मार्गावर मानवविरहीत रेल्वे फाटक आहे. दोन्ही बाजूला हा रेल्वे मार्ग सताड उघडा आहे. जगप्रसिध्द चिखला खाणीत मॅग्नीजची ने-आण करण्याकरिता ब्रिटीशांनी हा रेल्वे ट्रॅक घातला होता. महिन्यातून पाच ते सहा वेळा येथून मालवाहतूक गाडया धावतात. गावाच्या मध्यभागातून हा रेल्वे मार्ग जातो. रेल्वे प्रशासनाने येथे रस्त्याच्या शेजारी रेल्वे गाडी जातांनी समपार रेल्वे ट्रॅक केला तर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात येईल असा सूचना फलक तेवढा लावला आहे. गोबरवाही, चिखला, सीतासावंगी तथा प्रसिध्द हनूमान मंदिर चांदपूर येथे दररोज शेकडो नागरीक जातात. पुढे हा रस्ता सिहोरा व वारासिवनी मध्यप्रदेशाकडे जातो. मालवाहतूक गाडी जातांनी रेल्वेचा एक कर्मचारी या मानविरहीत रेल्वे फाटकाजवळ हिरवी, लाल झेंडी घेऊ न उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्याला थांबवितो. वाहनांची वर्दळ असल्याने व घाईने येथे त्या सूचनांचे पालन कधी कुणी करीत नाही. अशावेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. १०० वर्षापूर्वीची रहदारी व आताची रहदारी यात मोठी तफावत आहे. रेल्वे प्रशासन सुरक्षेची हमी निश्चित होते परंतु येथे कायमस्वरुपी फाटक सुरु करण्याची गरज आहे. प्रत्यक्ष मालवाहतूक गाडी जातांनी त्याचे छायाचित्र घेतांनी लोकमत प्रतिनिधीला काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. का रोखीत आहा असा प्रतिप्रश्न केल्यावर त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. सर्रास रेल्वे धावणे येथे मागील अनेक वर्षापासून येथे सुरु आहे हे विशेष. रेल्वे प्रशासनाला कोटयवधींचा महसूल येथे मॅग्नीज खाणीपासून मिळत आहे परंतु रेल्वे प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. लोकप्रतिनिधी येथे दखल घेण्याची गरज आहे.
आंतरराज्यीय मार्गावर मानवविरहित रेल्वे फाटक
By admin | Published: October 08, 2016 12:30 AM