महसूल बुडतोय : अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालताहेत व्यवसायभंडारा : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये विटा तयार करण्याचा व्यवसाय पूर्वीपासून सुरू आहे. मात्र आता नव्याने विटा व्यवसायाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने प्रत्येक व्यवसायिक शॉर्टकट मार्गाने कमी वेळेत विनापरवाना अवैध विटा व्यवसायाला चालना देत आहेत. त्यामुळे वातावरणात बराच बदल होत आहे. वीट भट्टीसाठी लागणारा कोंडा, वाळू, भसवा, माती यासाठी परवाना लागतो. पर्यावरण खात्याचाही परवाना लागतो. मात्र नियम धाब्यावर ठेवून ग्रामीण भागात विट व्यवसायाला उधान आले आहे. विटा व्यवसायाला लागणाऱ्या मातीला रॉयल्टी लागते. विटा तयार भसवा (बारीक वाळू) चा समावेश असतो. त्यालाही रॉयल्टी लागते. विना परवाना (रॉयल्टी) नसूनही विटा तयार करणाऱ्यांचा कार्यक्रम जोमात सुरू आहे. जिल्ह्यात विट व्यवसाय चांगलाच जोमात आहे. विना परवाना होत असलेल्या कामांकडे शासन तातडीने लक्ष देणार का? असाही प्रश्न निर्माण होत आहे. अवैध व्यावसायिकांकडून दंडात्मक कारवाई न करता दंडाची अर्धी रक्कम घेऊन परतत आहेत. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध विटाभट्टीचे काम जोमात सुरू आहे. या प्रकारावर आळा घालण्याकरीता पथक तयार करून त्यांची पाहणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
विनापरवाना विटाभट्टी जोमात
By admin | Published: March 30, 2017 12:37 AM