शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

रनेरा शिवारात वन संपदेला असुरक्षित कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:22 AM

वन परिक्षेत्र हरदोली कार्यालयाचे हद्दीत असणाºया तुमसर-बपेरा राज्य मार्ग लगत रनेरा शिवारात वन संपदेला जनावर व अन्य सामाजिक तत्त्वापासून सुरक्षा करण्यासाठी ......

ठळक मुद्देआठवडाभरात सुरक्षा कठड्यांची दुर्दशा : शासकीय निधीचा दुरुपयोग, लोकप्रतिनिधींचाही कानाडोळा रंजीत चिचखेडे ।

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : वन परिक्षेत्र हरदोली कार्यालयाचे हद्दीत असणाºया तुमसर-बपेरा राज्य मार्ग लगत रनेरा शिवारात वन संपदेला जनावर व अन्य सामाजिक तत्त्वापासून सुरक्षा करण्यासाठी झाडांच्या फांद्या तोडून कुंपण तयार करण्यात आले आहे. असुरक्षित कुंपण ७ दिवसात भुईसपाट झाल्याने शसकीय निधीचा दुरुपयोग करण्यात आला आहे.तुमसर बपेरा राज्य मार्ग लगत रनेरा गावाचे हद्दीत वन विभागाची १ हेक्टर ०९ आर जागा आहे. याच गावात कुरण चराई करिता ३३ हेक्टर आर जागा राखीव आहे. या शिवाय नजिक असणाºया रुपेरा गावाचे हद्दीत कुरण चराई करिता ८५ हेक्टर ८८ आर जागा राखीव करण्यात आली असून हरदोली गावात काही जागा राखीव आहे. या गावाचे हद्दीत झुडपी जंगल आणि वनाचे राखीव क्षेत्र असल्याने राज्य मार्गावर वन उपज तपासणी नाका तथा वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयाला मंजुरी दिली आहे. या कार्यालयात नव्याने प्रशासकीय कामकाज करण्यासाइी इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. वन संपदेचे सुरक्षा आणि संरक्षण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन गंभीर असल्याचे दिसून येत आहे. रिक्त जागा शासनाने भरल्या असून तरुण तुर्क कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. तुमसर-बपेरा राज्य मार्गाचे कडेला रनेरा शिवारात मौल्यवान वनसंपदा आहे. या वन संपदेचा विस्तार चिचोली आणि रामटेक पर्यंत झाला आहे. या वन संपदेला सुरक्षा आणि सरंक्षण देण्यासाठी राज्य मार्ग लगत कुंपण तयार करण्यात आले आहे. रस्त्याचे कडेला वृक्षरोपण करण्यात आले आहे. या झाडांनी कुंपण करण्यात आले असून मजबूत आणि टिकावू नाही. याच जंगलातील झाडांचे फाद्या तोडून त्याचा उपयोग कुंपण तयार करण्यात केला आहे. जनावरे व असामाजिक तत्त्व जंगलातील मौल्यवान वृक्षांची नासाडी करणार नाही अशी खात्री झाल्याने वन विभागाने तारेचे कुंपण करण्याऐवजी झाडांचे फाद्यांचे आधार या कुंपणात घेतला आहे. परिणामी ७ दिवसात असुरक्षित कुपणांची नासधूस झाली असून स्थिती जैसे थे आहे. या विकास कार्यात शासकीय निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु दर्जेदार कुंपण नसल्याने शासनाने विकास निधीचा दुउपयोग झाला आहे. या जंगलात जनावरे चरण्याकरीता सोडली जात आहे. असे करित असतांना वृक्षाची अवैध वृक्षतोड केली जात आहे. या जंगलाचे सुरक्षा आणि सरंक्षण करण्यासाठी डोंगरला पॅटर्न राबविण्याची ओरड आहे. या शिवाय असुरक्षित कवचाची चौकशी करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.रनेरा शिवारात वन संपदेला सुरक्षा आणि सरंक्षण देण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे वतीने कुंपन तयार करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक माहिती मला नाही.-वाय.एन.साठवणे, सहायक क्षेत्र, वनपरिक्षेत्राधिकारी हरदोली.वनाचे वाढते क्षेत्र होतेय भुईसपाट!सिहोरा परिसरात वन परिक्षेत्राधिकारी कार्यालय बपेरा आणि हरदोली गावात आहे. वन विभागाने गैस सिलेडर वाटपाची योजना सुरु केल्याने अवैध वृक्षतोडीवर आळा घालण्यास मदत मिळाली आहे. उज्ज्वला योजनेने यात मोठी भर पडली आहे. या परिसरात वन विभागाची ९५१ हेक्टर ९५ आर जागा राखीव वनात असून ४३८ हेक्टर ३३ आर जागा कुरण चराई करिता मुकरर करण्यात आली आहे.प्रत्यक्षात शासनाचे दस्तऐवजात असणारी ही जागा नोंदी नुसार उपलब्ध नाही. नदी पात्रात ५९२ हेक्टर ४६ आर, खतकुडे ९ हेक्टर १७ आर, ढोर फोडी १२ हेक्टर ५२ आर, मरगड ३३९ हेक्टर ०७ आर आणि पोट खरात ३५ आर जागा राखीव असली तरी जागा आता उपलब्ध नाही. यामुळे वनाचे घटते क्षेत्र चिंतेचा विषय आहे.परिसरात पर्यटनाला वावपरिसरात नद्यांचे संगम, तिर्थस्थळ, प्रकल्प तथा ग्रिन व्हॅली चांदपुर, संस्कृती जनजीवन आणि वनाचे क्षेत्र असतांना पर्यटकांनी आकर्षित करणारे नैसर्गिक सौंदर्य आहे. ग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाचे जलद गतीने विकास झाल्यास हजारो बेरोजगार तरुणांना रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे. इको टूरिज्म अंतर्गत विकास दिवास्वप्न ठरत आहे. हिवाळी अधिवेशनात प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रंचड इच्छा शक्तीची गरज आहे.