शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:34 AM

जिल्ह्यात आठवड्याभरानंतर पुन्हा अवकाळी पावसाने रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील पाच तालुक्यात पाऊस बरसल्याची माहिती असून या पावसामुळे रबी पिकांना मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देरबी पिकांना फटका : बोथली गावाजवळ कोसळले वृक्ष, धानाची पोती भिजल्याने बळीराजाचे वाढले टेंशन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात आठवड्याभरानंतर पुन्हा अवकाळी पावसाने रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील पाच तालुक्यात पाऊस बरसल्याची माहिती असून या पावसामुळे रबी पिकांना मोठा फटका बसला आहे. यात लाख, लाखोरी, चणा, हरभरा, गहू पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भंडारा शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.लाखांदूर, तुमसर, मोहाडी, साकोली तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. वादळामुळे वरठी ते मोहाडी राज्य मार्गावरील झाडे कोलमडून पडली. मोहाडी-भंडारा राज्यमार्गावरील बोथलीजवळ बाभळीचे झाड कोसळल्याने वाहतूक सकाळपासून ठप्प होती. क्रेनच्या सहायाने झाड बाजूला करून व मजुरांकरवी झाड कापून रस्ता मोकळा करण्यात आला.तुमसर : शनिवारी मध्यरात्री अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात धानाची पोती भिजली. शेतकरी वर्गाचे येथे मोठे नुकसान झाले. काही व्यापारी बाजार समितीतून धानाची खरेदी करतात. त्याचीही धान पोती भिजल्याचे समजते. पूर्व विदर्भात प्रसिध्द बाजार समिती असूनही शेतकऱ्यांचा धान येथे उघड्यावर ठेवला जातो.शनिवारी मध्यरात्री तुमसर शहर व तालुक्यात अवकाळी पाऊसाने सुमारे एक तास झोडपले. अचानक पाऊस बरसल्याने तारांबळ उडाली. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या मार्केट यार्डात धानाची पोली ओलिचिंब झाली. सदर धान शेतकऱ्यांचे होते अशी माहिती आहे. धान ओले झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. पुन्हा ते धान उन्हात वाळू घालावे लागणार आहे. एकदा धान पाण्यात भिजले तर त्याची किंमत कमी होते. धान भरडाई वेळी तो तुटतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.बाजार समितीचा मार्केड यार्ड मोठा असून बाजार समिती श्रीमंत आहे. अनेक बांधकामे येथे करण्यात आली. प्रवेशद्वारावर येथे पैसा खर्च करण्यात येत आहे. किमान धान तथा इतर पिकांच्या सुरक्षेकरिता शेडची व्यवस्था करण्याचे नियोजन बाजार समितीने करण्याची गरज आहे. बाजार समितीने शेतकºयांचे हित जोपासने गरजेचे आहे.साकोली : रविवारी सकाळी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकाचे नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकट डोक्यावर असतांनी त्यातच अस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे.रविवारी पहाटे साकोली तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे हरभरा, उडीद, मुंग, लाख-लाखोरी आदी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. साकोली तालुक्यातील धान खरेदी केंद्र हाऊसफुल झाले आहेत. नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी धानाला ५०० रुपये प्रती क्विंटल बोनसची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी धान विक्रीस पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे आधीच हाऊसफुल झालेले धानाच्या गोडाऊनमध्ये जागा अपूरी असल्यामुळे बऱ्याच धान केंद्रावर बाहेर ढेवलेले धान ओले झाले. तर बºयाच शेतकºयांनी गहु तोडला आहे. या पावसामुळे जमा केलेला गहू खराब होण्याची शक्यता आहे.मागील महिन्याभरापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसन्याची ही तिसरी वेळ आहे. वारंवार अस्मानी संकटाला सामना देत बळीराजाचे टेन्शन वाढत आहे. दुसरीकडे उन्हाळा सुरुहोताच विटा व्यवसायीकांचेही चांगले दिवस येतात. मात्र अवकाळी पावसामुळे विटाभट्टी चालकांचे नुकसान झाले आहे.शासनाने शेतकऱ्यांसह विटभट्टी चालकांच्या नुकसानी संदर्भात पंचनामा करुन आर्थिक मदत द्यावी, अशी मुख्य मागणी आहे. दुसरीकडे धान खरेदी केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊस