लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मेघ गर्जनेसह जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला. विशेषत: उन्हाळी धानावर याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तव्दतच भाजीपाला पिकांवरही संक्रात आली आहे.यावर्षी हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. भंडारा शहरात रात्री ११.३५ वाजताच्या सुमारास मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी वीज पुरवठाही खंडीत झाला. पहाटे ५ वाजतापर्यंत अधूनमधुन ब्रेक घेत पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून पुन्हा ऊन निघाली. दुपारी ३ वाजतानंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.कोंढा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ११.४५ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही परिसरात बोरीच्या आकाराच्या गारा पडल्या. कौलारु तसेच सिमेंटचे पत्र असलेल्या घराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील साकोली, पवनी, लाखनी, मोहाडी व तुमसरातही पाऊस बरसल्याचे वृत्त आहे.पालांदूर येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतमालाचे नुकसान झाले असून उन्हाळी धानाचा हंगाम प्रभावीत झाला आहे.कापणी केलेल्या धानाच्या कडपा ओलेचिंब झाले आहे. काही शेतशिवारात शेतकऱ्यांनी तुडतुड्याची लागल झाली म्हणून फवारणी सुध्दा केली होती. यात धानपीक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाºयासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.लाखांदुर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, काल ९ मे रोजी झालेल्या गारपिटीसह वादळी पावसाने तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी बेजार झाले असून हाता पोटात आलेले उन्हाळी धान पिक नष्ट होण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. या गारपीटीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील काही घरांची तुरळक नुकसान देखील झाले आहे.यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यातील चौरस भागासह अन्य भागात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे व कीड रोगामुळे आधीच धानाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर असतांना ऐन पंधरवाड्याने कापणीला आलेल्या धानावर गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक शेतकºयांच्या शेतातील धानाच्या लोंबी झडल्या आहेत.तर काही धानाचा निसवा होण्यापुर्वीच गारपिटीने धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊन पेरवा या किडयुकित धानाच्या लोंबी बाहेर पडण्याची भिती देखील शेतकºयांत वर्तविली जात आहे. या गारपिटीमुळे ग्रामीण भागातील घरांच्या छपरावरील कवेलुंची देखील तुरळक प्रमाणात हाणी झाल्याचे देखील काही नागरिकांनी सांगीतले आहे मात्र कोरडवाहु शेतकºयांसाठी सदरचा अवकाळी पोषक ठरतांना ऊन्हाळी पिक उत्पादकांसाठी बाधक ठरल्याची बोंब आहे.महागडे बी बियाने व पिककर्ज घेऊन खरीप हंगामात परतीच्या पावसाने तर उन्हाळी हंगामात कधी अवकाळी व सध्याच्या गारपिटीसह वादळी पावसाने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 5:00 AM
कोंढा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ११.४५ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही परिसरात बोरीच्या आकाराच्या गारा पडल्या. कौलारु तसेच सिमेंटचे पत्र असलेल्या घराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील साकोली, पवनी, लाखनी, मोहाडी व तुमसरातही पाऊस बरसल्याचे वृत्त आहे.
ठळक मुद्देशहरासह ग्रामीण भागात दमदार पाऊस : कोंढा परिसरात बोरीच्या आकाराच्या गारा