भंडारा : काश्मीर येथील उरी येथे झालेल्या हल्ल्यात निष्पाप १८ जवानांचा बळी गेला. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध भंडारा येथील वयोवृद्धांनी केला. यात वरिष्ठ नागरिकांसह कृतीशिल सेवानिवृत्त कर्मचारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. सोमवारी जिल्हाधिकारी चौकात या वयोवृद्धांनी उरी येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी नंदलाल शुक्ला, भगिरथ नागलवाडे, माधव फसाटे, लक्ष्यपाल केवट, तुळशीराम कडव, आनंदराव बावनकर, विनायक कोरे, वामनराव गायकवाड, श्याम कुकडे, पी.बी. चपडे, व्ही. साखरकर, मुकूंदा भांडे, दामोधर सार्वे, जि.पी. बाकडे, विना बोरकर, श्रावण मेश्राम, खुशाल साठवणे, मुलचंद वाडीभस्मे, बाबुराव डोये, एस.एस. बोरकर, आर. के. कृष्णा, एल.बी. मेश्राम, मारोती कावळे, पी.आर. भालाधरे, चिंधु बुधे, डी.एम. नेवारे, डॉ. एस.जी. सोमवंशी, प्रभाकर आजबले यांच्यासह अनेक वयोवृद्ध उपस्थित होते.पंतप्रधान यांच्यानावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. यात उरी हल्ल्याचा निषेध करून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करीत असल्याचे म्हटले आहे. तसेच केंद्र शसनाने सर्जीकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांचा बिमोड केला. याबद्दल शासनाचे कौतुक करण्यात आले. (प्रतिनिधी)
उरी हल्ल्याचा वयोवृद्धांनी केला निषेध
By admin | Published: October 04, 2016 12:31 AM