आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा परिषद माध्यमिक विभागातील कार्यरत शिक्षकांना पदोन्नती, समायोजनाने समायोजित केल्यानंतर रिक्त जागांवर जिल्हा परिषद प्राथमिक विभागातून शिक्षकांना ‘विकल्प’चा आधार घेऊन समायोजित करावे. या आशयाचे निवेदन शिक्षक कृती समितीने मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिले.खासगी माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषदमधील माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांबाबत विकल्प मागविण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षकांना मागील चार वर्षापासून पदोन्नती देण्यात आलेले नाही व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रखडले आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमधील पदोन्नतीने, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच इयत्ता ६ त ८ वर सहाय्यक शिक्षकांमधून पदे भरण्यात यावी यानंतर जिल्हा परिषद शिक्षकांमधील रिक्त जागेवर जिल्हा परिषद प्राथमिक जागेवरील शिक्षकांना विकल्पाने समायोजन करावे अशी मागणी यावेळी शिक्षक कृती समितीच्या शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व रमेश सिंगनजुडे, ईश्वर नाकाडे, सुधीर वाघमारे, सुधाकर ब्राम्हणकर, रमेश पारधीकर, मुकुंद ठवकर, ज्ञानेश्वर दमाहे आदींनी केले.विकल्पाने समायोजित करेपर्यंत खासगी माध्यमिक शाळेतील कोणत्याही अतिरिक्त शिक्षकाला जि.प. माध्यमिक शाळेत समायोजित करू नये. असे केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक कृती समितीने दिला आहे. या मागण्यांचे निवेदन प्राथमिक उपशिक्षणाधिकारी विनय दुबे यांना देण्यात आले. यावेळी अधीक्षक विनोद शामकुवर, रविंद्र राठोड, मनोजकुमार तेलमासरे उपस्थित होते.मागीलवर्षी जिल्हा परिषदमध्ये शिक्षक पद भरती प्रकरण गाजले. याप्रकरणात तत्कालीन शिक्षण अधिकाºयांसह काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी अशा चुका होऊ नये व कर्मचाºयांवर कारवाईचे संकट ओढवू नये यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने अगोदर खबरदारी घेऊन रिक्त पदे भरताना शासनाच्या निकशाला अधिन राहूनच पदभरती करावी. पदोन्नतीचे रखडलेले प्रकरण त्वरीत मार्गी लावावे. रिक्त पदांमुळे अनेक शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली. त्यातच शासनाच्या वतीने वेळोवेळी देण्यात येत असलेली अशैक्षणिक कामाची जबाबदारी लादू नये, अशी मागणीही यावेळी शिक्षक कृती समितीच्या शिष्टमंडळाने केली. सर्व शिक्षकांना शिक्षण विभागाच्या नियमाच्या चाकोरीतच बसून व त्यांची तंतोतंत अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.अशा आहेत मागण्यामाध्यमिक विभागातील पदोन्नती व समायोजन करूनच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, प्राथमिक विभागातील पदोन्नती समायोजन करून आंतरजिल्हा बदलीची रिक्त पदांची माहिती द्यावी, शालेय पोषण आहाराचे मानधन व बिल त्वरीत द्यावे, निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी प्रकरण त्वरीत निकाली काढावे, डीसीपीएसच्या जमा रकमेचा हिशोब द्यावा आदी मागण्यांचा यात समावेश होता.
रिक्त पदे भरताना ‘विकल्प’ वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:42 PM
जिल्हा परिषद माध्यमिक विभागातील कार्यरत शिक्षकांना पदोन्नती, समायोजनाने समायोजित केल्यानंतर रिक्त जागांवर जिल्हा परिषद प्राथमिक विभागातून शिक्षकांना ‘विकल्प’चा आधार घेऊन समायोजित करावे.
ठळक मुद्देशिक्षक कृती समितीची मागणी : मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन