शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

विरोधात ठराव न लिहिण्यासाठी पदाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:05 PM

सिरसोली/कान्हळगाव येथील ग्रामपंचायतच्या मासिक सभेत विरोधात ठराव लिहायचे नाही असे धमकावून गोंधळ घातला.

ठळक मुद्देसिरसोली येथील प्रकार : मासिक सभेत गोंधळ

आॅनलाईन लोकमतमोहाडी : सिरसोली/कान्हळगाव येथील ग्रामपंचायतच्या मासिक सभेत विरोधात ठराव लिहायचे नाही असे धमकावून गोंधळ घातला. अखेर अध्यक्षांच्या परवानगीने दोन सदस्यांचे मत नोंदविण्यात आले. तथापि, ठरावात सविस्तर मत लिहिण्यासाठी त्या सदस्यांचा आग्रह पूर्ण होऊ शकला नाही, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.ग्रामपंचायत सिरसोलीची फेब्रुवारी महिन्याची मासिक सभा पार पडली. अतिक्रमण व ग्रामसेवकाच्या असहकार्य भूमिकेवरून रणकंदन झाले. ग्रामपंचायत सदस्य गजानन बशिने यांनी आपल्या घराशेजारील नाली बुजवली. त्यामुळे नालीतील सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा झाला. त्या जागेवर बशिने यांनी अतिक्रमण केले. सदर विषय अध्यक्षांच्या परवानगीने विषय सूचित घेण्यात आला. अतिक्रमण विषय का घेतला म्हणून गजानन बशिने यांनी ग्रामसेविकेच्या जवळचे बाक वाजवून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मी सदस्य असताना हा विषय कसा काय आणू शकता असा गोंधळ घातला. अखेर विषय पटलावर आल्याने चर्चा झाली. ठरावही घेण्यात आला. ठरावाला ग्रामपंचायत सदस्य गजानन बशिने व शबनम तुरक यांनी विरोध केला. आमचे मत सविस्तर लिहण्यात यावे असा दबाव सचिवावर करण्यात आला. सविस्तर मत लिहता येत नाही. ठरावाच्या विरोधात असल्याची नोंद घेता येईल असे सांगून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न सरपंच अंकुश दमाहे यांनी केला. त्या दोन्ही सदस्याचे विरोधी मत नोंदविले गेले आहेत. सिरसोली ग्रामपंचायतचे काम पारदर्शक आहे. त्यामुळे मासिक बैठकीत सर्व पत्र व नमुन्याचे वाचन केले जाते. शासकीय पत्राचे वाचनही होते. घेतलेल्या मासिक सभेच्या ठरावाची प्रत सर्व सदस्यांना उपलब्ध करून देण्यात येत असते. प्रत्येक महिन्याची ठरावाची प्रत विरोधी सदस्यांनाही देण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सरपंच दमाहे यांनी सांगितले. गावातील नाल्यांची सफाई करण्यात आली. गजानन बशिने यांनी नाली बुजविली व अतिक्रमण केल्याने केवळ तीच नाली साफ करायची शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली. गावकºयांना दाखले वेळेवर दिले जातात. अर्ज प्राप्तीनंतरच दाखले देण्याची प्रक्रिया होते. ग्रा.पं. सदस्य गजानन बशिने व शबनम तुरक यांनी चुकीचे काम झाकण्यासाठी पदाचा दुरुपयोग करीत आहेत अशी माहिती सरपंच अंकुश दमाहे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गजानन बशिने यांनी नालीवर अतिक्रमण केले तर ग्रा.पं. सदस्या शबमन तुरक यांनी घरकुलाचे हप्ते व बांधकाम प्रमाणपत्र मिळावे यासाठी बळाचा वापर करताहेत. शबनम तुरक यांचे वडील व काका यांनी घरकुलाचे काम केले नाही. दोन वर्षापासून काम अर्धवट आहे तरी बिल काढा असा दबाव सचिवांवर घालत आहेत. बिल मिळाले नाही तर बघून घेण्याची धमकी देण्यापर्यंत मजल गेल्याची माहिती सरपंच अंकुश दमाहे यांनी दिली. गावाच्या विकासाचे विषय बाजूला नेण्यासाठी कसे समाजविरोधी कारवाया करीत असल्याचे मत पत्रकार परिषदेतील उपस्थित ग्रा.पं. सदस्यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला उपसरपंच अजहर शेख, ग्रा.पं. सदस्य अरुण कस्तुरे, वैशाली दमाहे, सीमा बसिने, वच्छला बावणे, प्रताप लिल्हारे, राजू बावणे, सुरेंद्र कस्तुरे, धराज शहारे,खेमलाल दमाहे, नंदलाल दमाहे, प्रभू गाढवे आदींची उपस्थिती होती.