भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात ३७ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. त्यातील अर्धा अधिक धान उघड्यावर होता. सध्या ही १० लाख क्विंटल धान उघड्यावर आहे. अशा स्थितीत रबी हंगामातील धान खरेदी सुरू झाली. परंतु गोदाम नसल्याने हा धान कुठे ठेवावा, असा प्रश्न आहे. परिणामी खरेदी ठप्प झाली आहे. यावर पर्याय म्हणून कोरोना संकटात बंद असलेल्या शाळा आणि गावा गावातील समाज मंदिरांचा उपयोग धान साठविण्यासाठी करावा, अशी सूचना आपण जिल्हा प्रशासनाला केल्याचे सांगितले. रबी धानाची मुदत वाढही आपण मिळवून दिल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
कोरोना संकटामुळे मत्स्य व्यवसाय करणारे बांधव संकटात आले आहे. आता त्यांना या संकटात मदत म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत येणारे तलाव मत्स्य व्यवसायासाठी सहकारी संस्थांना लीजवर दिले होते. त्याची लीज वाढवून देण्यात आली असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही याबाबत जिल्हा परिषदेने एक आदेशही निर्गमीत केला आहे. ओबीसीचे अधिकार आबाधित रहावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, प्रेमसागर गणवीर, अतुल लोंढे, हिरालाल नागपुरे, राजेश हटवार उपस्थित होते.भंडारा : रबी हंगामातील खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी गोदामांची पुरेशी सुविधा नसल्याने कोरोना संकटामुळे बंद असलेल्या शाळा आणि समाज मंदिराचा उपयोग धान साठविण्यासाठी करावा, अशी सूचना आपण प्रशानाला दिली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात ३७ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. त्यातील अर्धा अधिक धान उघड्यावर होता. सध्या ही १० लाख क्विंटल धान उघड्यावर आहे. अशा स्थितीत रबी हंगामातील धान खरेदी सुरू झाली. परंतु गोदाम नसल्याने हा धान कुठे ठेवावा, असा प्रश्न आहे. परिणामी खरेदी ठप्प झाली आहे. यावर पर्याय म्हणून कोरोना संकटात बंद असलेल्या शाळा आणि गावा गावातील समाज मंदिरांचा उपयोग धान साठविण्यासाठी करावा, अशी सूचना आपण जिल्हा प्रशासनाला केल्याचे सांगितले. रबी धानाची मुदत वाढही आपण मिळवून दिल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
कोरोना संकटामुळे मत्स्य व्यवसाय करणारे बांधव संकटात आले आहे. आता त्यांना या संकटात मदत म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत येणारे तलाव मत्स्य व्यवसायासाठी सहकारी संस्थांना लीजवर दिले होते. त्याची लीज वाढवून देण्यात आली असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही याबाबत जिल्हा परिषदेने एक आदेशही निर्गमीत केला आहे. ओबीसीचे अधिकार आबाधित रहावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, प्रेमसागर गणवीर, अतुल लोंढे, हिरालाल नागपुरे, राजेश हटवार उपस्थित होते.
बॉक्स
कितीही विरोध केला तरी जम्बो कोविड सेंटर होणारच
भंडारा जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडाला होता. अनेकांना कोरोनाची बाधा झाली. काहींचा बळी गेला. हीच परिस्थिती पुन्हा उदभवून नये. सर्वसामान्यांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी वरठी येथे जम्बो कोविड सेंटर उभारले जात आहे. ५०० ऑक्सिजन खाटांची सुविधा असलेल्या या कोविड सेंटरला काहींचा विरोध आहे. मात्र पैसा कितीही लागला तरी चालेल. सामान्यांचा जीव वाचला पाहिजेच. म्हणूनच कोणी कितीही विरोेध केला तरी कोविड सेंटर उभारणारच, असे नाना पटोले म्हणाले. जिल्हा रुग्णालयात ३५० मॅट्रिक टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लॉट तालुका ठिकाणी उभारले जात आहे. याचा फायदा सर्वसामान्य जनतेलाच होणार आहे.