लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील तुमसर- देव्हाडी या पाच किमी रस्ता रुंदीकरणाच्या भरावात काही ठिकाणी लाल व काळी गिट्टी मिश्रीत मातीचा वापर केला जात आहे. त्यामुळे संबंधित रस्ता बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रस्ता कामाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.तुमसर- देव्हाडी रस्ता बांधकामाला आठ ते नऊ महिन्यांपासून प्रशासनाची मान्यता मिळाली आहे. गोबरवाही- मिटेवानी- तुमसर -देव्हाडी असा रस्ता बांधकामाचा मार्ग असून तुमसर शहर व गोंदिया राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रस्ता बांधकामाला सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला जातो. रस्त्याच्या एका बाजुला भरावाचे का प्रगतीपथावर आहे. मात्र रस्ता भरावात काही ठिकाणी लाल-काळ्या मातीचा वापर करण्यात येत असल्याने भविष्यात वाहतूकीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. देव्हाडी मार्गावर गोपीकिशन शाळेजवळ नाल्याशेजारी भरावात माती वापरण्यात आली आहे. संपूर्ण रस्ता बांधकामात जास्तीत जास्त प्रमाणात गिट्टीमिश्रीत लाल माती वापरण्यात आली आहे. देव्हाडी गावशिवारात रस्त्यावर केवळ मुरुमाचा भराव घालण्यात आला आहे.प्रशासनाच्या परवानगीवर प्रश्नचिन्हरस्ता बांधकामात काळी माती गिट्टी मिश्रीत लाल माती व मुरुमाचा वापर केला जात आहे. एकाच रस्ता बांधकामासाठी तीन गौण खनिजांच्या वापराला बांधकाम विभागाने परवानगी दिलीच कशी असा प्रश्न नागरिकातून विचारला जात आहे.साधारणपणे भरावासाठी मुरुमाचा वापर करण्यात येतो. लाल, काळ्या गिट्टी मिश्रीत मातीचा वापर केल्याने वाहनांना धोका निर्माण होत आहे. या प्रकाराकडे वरिष्ठानी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.देव्हाडी परिसरात रात्री होतेय उत्खननदेव्हाडी शिवारात रात्री जेसीबीने मुरुमाचे उत्खनन करण्यात येत आहे. याच मुरुमाचा वापर रस्ता बांधकामासाठी केला जात असल्याची शंका आहे. परवानगी विणा मुरुम उत्खनन होण्याची शक्यता वापरता येत नाही. महसुल विभागाने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.तुमसर- देव्हाडी रस्ता भरावात मुरुमाचा वापर केला जात असून अन्य गौण खनिजाचा वापर केला जात असला तरी शेवटी एक मुरुमाचा भराव घालण्यात येणार आहे.- डी. एल. शुक्ला,उपविभागीय अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभाग तुमसर
रस्ता भरावात मातीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 5:00 AM
तुमसर- देव्हाडी रस्ता बांधकामाला आठ ते नऊ महिन्यांपासून प्रशासनाची मान्यता मिळाली आहे. गोबरवाही- मिटेवानी- तुमसर -देव्हाडी असा रस्ता बांधकामाचा मार्ग असून तुमसर शहर व गोंदिया राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रस्ता बांधकामाला सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला जातो.
ठळक मुद्देतुमसर-देव्हाडी रस्ता बांधकाम : पाच किमी रस्त्याची गुणवत्ता धोक्यात