लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील केसलवाडा (वाघ) ते अड्याळपर्यंतच्या राज्य महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. सदर काम शिवालय कंस्ट्रक्शन कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या रस्ता रूंदीकरणाच्या कामात निकृष्ठ प्रतीचे साहित्य वापरले जात असून शासकीय पैशाचा गैरवापर होत आहे. या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी आहे.राज्य महामार्ग रूंदीकरणाच्या कामात मुरूमाऐवजी पिवळी माती भिसचा वापर करण्यात येत आहे. तसेच काळ्या गिट्टीऐवजी पांढऱ्या गिट्टीचा वापर केला जात आहे. रूंदीकरणाचे अंदाजपत्रक मोजमाप पुस्तिकेच्या अनुषंगाने काम केले जात नाही. मातीमिश्रीत मुरूमाचा वापर रूंदीकरण्यात केला जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य शासन यांच्या अधिकाºयाची शिवालयला राज्य शासनाकडून मिळाले आहे. त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी अंभियंत्याची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. डेहराडूनच्या एका कंपनीला नियंत्रणाचे काम दिले असल्याची माहिती आहे.प्रयोगशाळेत सर्व बांधकाम साहित्याची तपासणी करून मुरूम, माती, गिट्टी आदी साहित्याचा वापर बांधकामात केला जातो. त्याला तज्ज्ञ अभियंत्याकडून मंजुरी दिली जाते. त्यानंतर त्याचा वापर केला जातो.-संतोष द्विवेदी, पीआरओ, शिवालय कंस्ट्रक्शन, लाखनीसाईट.
राज्य महामार्ग रूंदीकरणात निकृष्ट साहित्याचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:01 PM
तालुक्यातील केसलवाडा (वाघ) ते अड्याळपर्यंतच्या राज्य महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. सदर काम शिवालय कंस्ट्रक्शन कंपनीद्वारे करण्यात येत आहे.
ठळक मुद्देअपघाताच्या घटनात वाढ : केसलवाडा वाघ ते अड्याळ मार्ग ठरत आहे धोकादायक