मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूल बांधकामात रिकाम्या पोकळीत पॅकींगकरिता लाकडी गिट्टीचा आधार देण्यात आला आहे. हजारो टनाचे वजन एक लाकडी गिट्टी सहन करीत आहे. हा कुतुहलाचा विषय आहे. पॅकींग केल्यावरही पावसाळ्यात पोकळीतून पाण्यासह फ्लाय अॅश रस्त्यावर आली होती. दगडाच्या वजनाने गिट्टी तुटली तर दगड निश्चितच आपली जागा सोडणार आहेत. नेमकी तांत्रिक कारणांकरिता गिट्टीचा उपयोग केला जातो काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी रेल्वे क्रॉसिंग ५३२ वर रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. सुमारे २४ कोटींचा हा उड्डाणपूल आहे. सध्या दोन्ही बाजूला अॅप्रोच पूलाचे बांधकाम सुरू आहे. फ्लाय अॅश भरावात घालण्यापूर्वी पूलाला दगडी भिंतीचे बांधकाम करणे सुरू आहे. एकावर एक असे दगड ठेवण्यात येतात. प्रत्येक दगडांचे वजन काही टनांचे आहे. सदर दगड भरीव सिमेंट काँक्रीटचे आहे. दोन्ही बाजूंच्या दगडाला एका मजबुत पट्ट्यांनी बांधले जाते. दगड एकमेकावर ठेवल्यानंतर गॅप राहते. जिथे राहत नाही तिथे दगडाला हलके फोडण्यात येते. गॅपमध्ये लाकडी गिट्टी फिक्स केली जाते.गिट्टी ही प्रत्येक दगडाला पॅकींग केली आहे. गिट्टीचा लाकूड हा सर्वसाधारण आहे. गिट्टी फिक्स केल्यानंतर काही दिवसांनी ती निश्चितच बाहेर पडणार आहे. काही ठिकाणी सध्या ती नाही. घट्ट पकडीकरीता गिट्टीचा वापर होतो काय, पोकळी गिट्टीमुळे बंद झाली तर पावसाळ्यात पाण्यासह फ्लाय अॅश रस्त्यावर कसे आले, हा मुख्य विषय येथे उपस्थित होत आहे.विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात लाकडांचा अथवा लाकडी वस्तुंचा वापर हद्दपार झाला. लाकडाला दुसरे पर्याय नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेकडो टन दगडांचा वजन आहे. फ्लाय अॅशचा रेटा निश्चितच दगडांना बसणार आहे. उड्डाणपूलावरून शेकडो टन वजनाचे ट्रक धावणार आहेत. त्यामुळे गिट्टीच्या वापरावर प्रश्नचिन्ह येथे उपस्थित होत आहे. 'उंटाच्या तोंडात जिरा' असाच हा प्रकार येथे दिसत आहे. येथून ये-जा करणारे निश्चितच कुतुहलाने सदर गिट्टीकडे पाहतात.
उड्डाणपुलात लाकडी गिट्टीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:43 PM
देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूल बांधकामात रिकाम्या पोकळीत पॅकींगकरिता लाकडी गिट्टीचा आधार देण्यात आला आहे. हजारो टनाचे वजन एक लाकडी गिट्टी सहन करीत आहे. हा कुतुहलाचा विषय आहे. पॅकींग केल्यावरही पावसाळ्यात पोकळीतून पाण्यासह फ्लाय अॅश रस्त्यावर आली होती. दगडाच्या वजनाने गिट्टी तुटली तर दगड निश्चितच आपली जागा सोडणार आहेत. नेमकी तांत्रिक कारणांकरिता गिट्टीचा उपयोग केला जातो काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठळक मुद्देदेव्हाडीतील प्रकार : कुतुहलचा विषय, दगडी भिंतीतील पोकळी