चारगाव (सुंदरी) येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखान्यात एक वर्षापासून अधिकाऱ्यांचे पद रिक्त असून केंद्र बंदावस्थेत आहे. येथील शेतकरी, पशुपालकांस जनावरांना आजार झाल्यास कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या गावात खासगी डॉक्टर्सही येत नाही. साकोली ६ किमी व सौंदड ७ किमींचे अंतर गाठावेच लागते. त्यातही उपचार वेळीच न मिळाल्याने जनावरेही मागे दगावली. पण पशुवैद्यकीय विभागाचे याप्रकरणी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा स्थितीत या संयुक्त गाव परिसरात तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अन्यथा या शासकीय इमारतीत गरजू लोकांसाठी निवासालय बनवावे लागेल, असा इशारा शेतकरी, पशुपालक, सरपंच मोहन लंजे, उपसरपंच लता भिवगडे, सदस्य कमिटीचे रूपेश मोटघरे, मनोज जुगनाके, कविता वलथरे, मंगला सोनवाने, नरेश लंजे, सुरेश लंजे, मनिराम लंजे, धनराज बागडे, महागू कापगते, राजकुमार लंजे यांनी शासनाकडे केली आहे.
चारगावतील पशुवैद्यकीय केंद्रात वर्षभरापासून अधिकाऱ्यांचे पद रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:36 AM