शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

१५ ते १८ वयाेगटातील ५५ हजार मुलांचे आजपासून लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2022 11:58 PM

काेराेनासह ओमायक्राॅनचा संसर्ग सर्वत्र वाढत असून जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. आता शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात साेमवारपासून १५ ते १८ वर्ष वयाेगटातील मुलांना काेराेना लस टाेचली जाणार आहे. यासाठी आराेग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हा रुग्णालय, अल्पसंख्याक वसतिगृह यासह लाखनी, अड्याळ, लाखांदूर, पवनी, माेहाडी, सिहाेरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणि तुमसर व साकाेली येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील १५ ते १८ वयाेगटातील ५५ हजार ७५५ मुलांच्या लसीकरणाला साेमवारपासून प्रारंभ हाेत आहे. यासाठी आराेग्य विभाग सज्ज झाला असून जिल्हा रुग्णालयासह दहा ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन नाेंदणीला १ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे.काेराेनासह ओमायक्राॅनचा संसर्ग सर्वत्र वाढत असून जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. आता शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात साेमवारपासून १५ ते १८ वर्ष वयाेगटातील मुलांना काेराेना लस टाेचली जाणार आहे. यासाठी आराेग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हा रुग्णालय, अल्पसंख्याक वसतिगृह यासह लाखनी, अड्याळ, लाखांदूर, पवनी, माेहाडी, सिहाेरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणि तुमसर व साकाेली येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. माधुरी माथुरकर यांच्या नेतृत्वात ही माेहीम जिल्हाभर राबविली जाणार आहे. १५ ते १८ वयाेगटातील मुलांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी काेराेनाचे तब्बल चार रुग्ण वाढल्यानंतर प्रशासन अधिकच गंभीर बनले आहे. सर्वच वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण हाेणे आता नितांत गरजेचे झाले आहे.

काेव्हॅक्सिन लसच मुलांना देणार- १५ ते १८ वर्ष वयाेगटातील मुलांसाठी केवळ काेव्हॅक्सिन लस वापराच्या सूचना आराेग्य संचालनालयाने दिल्या आहे. वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑन इम्यूनायझेशन एनटीएजीआय यांनी केवळ काेव्हॅक्सिन लसीची सूचना दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात केवळ या वयाेगटाला काेव्हॅक्सिन लसच टाेचली जाणार आहे. 

काेविन सिस्टिमवर नाेंदणीची सुविधा- लसीकरणासाठी २००७ वा त्यापूर्वी जन्म झालेले मुले पात्र राहणार आहेत. त्यांना काेविन सिस्टिमवर स्वत:च्या माेबाइल नंबरद्वारे लसीकरणासाठी नाेंदणी करता येईल. ही सुविधा १ जानेवारीपासून उपलब्ध झाली आहे. तसेच लसीकरण केंद्राच्या ठिकाणीही जाऊन नाेंदणीचीही सुविधा उपलब्ध राहणार आहे. याचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रिकाॅशन डाेस १० जानेवारीपासून- हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींसाठी १० जानेवारीपासून प्रिकाॅशन डाेस दिला जाणार आहे. या डाेससाठी लाभार्थ्यांने दुसऱ्या डाेसच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असावे. सहव्याधी व्यक्तींनी डाॅक्टराच्या सल्ल्याने लसीकरण करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस