मोहाडी सर्वचिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी प्रियंका भिवगडे यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत डॉ. उपवंशी, पशुसेवक नंदूरकर, बादल लांडगे, कर्मचारी सपाटे यांच्या सहकार्याने तीन गावात विशेष लसीकरण शिबिर लावण्यात आले. शिबिरात सुमारे २,०४७ जनावरांना विविध रोगांचा प्रतिबंधक टिका लावण्यात आला. तसेच वंध्यत्व निवारण तपासणी, गर्भतपासणी व उपचार करण्यात आले.
ढिवरवाडा गावात लोकप्रतिनिधी व पशुपालकांच्या प्रतिसादामुळे पशुविभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी बोरगाव येथे पायखुरी, तोंडखुरी, घटसर्प रोगांसाठी एकूण ५०० जनावरांचे लसीकरण केले. १९ जनावरांची गर्भ व वंध्यत्व निवारण तपासणी तर ५० जनावरांवर उपचार करण्यात आले. शनिवारला पालोरा येथे ७०० जनावरांचे लसीकरण व औषधोपचार करण्यात आले. ८० जनावरांवर औषधोपचार, १८ जनावरांची गर्भतपासणी, तर १५ जनावरांची वंध्यत्व निवारण तपासणी करण्यात आली.
यावेळी पालोराचे सरपंच महादेव बुरडे, सदस्य भोजराम तिजारे, रोशन कढव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, उमेश तुमसरे, बोरगावचे सरपंच अर्चना पिंगळे, शामराव पिंगळे, उपसरपंच किसन बोदरे, केऊजी सिंदपूरे, अर्जुन उरकुडे, दुर्योधन टिचकुले, उमराव अतकरी, अनिक पत्रघरे, प्रवीण बारकर, मयाराम बाँदरे, विनोद बोंदरे, संजय ठाकरे, मोहन अतकरी आदी पशुपालक उपस्थित होते.
110921\img_20210910_103353.jpg~110921\img_20210910_103216.jpg
पालोरा व बोरगाव १,३७७ जनावरांचे लसीकरण~पालोरा व बोरगाव १,३७७ जनावरांचे लसीकरण