शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

आदिवासी भागातील नागरिकांचा लसीला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:33 AM

केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या १३०० वर जाऊन पोहचली असताना मात्र इळदा, राजोली व भरनोली या ...

केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या १३०० वर जाऊन पोहचली असताना मात्र इळदा, राजोली व भरनोली या आदिवासीबहुल परिसरात लसीकरण मोहिमेला नागरिक ठेंगा दाखवीत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. याचे कारण जाणून घेतले असता आदिवासी भागातील लोकांची जीवनशैली कोरोना विषाणूला दूर सारत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातच नव्हे तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. दररोज रुग्णसंख्येत लक्षणीय भर पडत असल्याचे दिसून येते. मात्र आदिवासीबहुल भाग समजला जाणाऱ्या इळदा, भरनोली व राजोली या गावात कोरोनाला धुमाकूळ घालता आला नाही.

याला कारण म्हणजे आदिवासी भागातील जीवनशैली कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. जंगलात वास्तव्याला असणारे आदिवासीबांधव काटक प्रकृतीचे असतात, शिवाय नैसर्गिकरीत्या पिकविलेले सात्विक अन्न ग्रहण करतात. त्यामुळे कोरोना संसर्गाला फारसा वाव मिळत नाही.

या भागातील लोकांचा वनौषधीवर अधिक भर असल्याने त्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते. शारीरिक श्रम, वनसंपत्ती असलेल्या रानभाज्या व फळे यांचा आहारात नेहमी उपयोग करीत असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती प्रबळ ठरली आहे.

कोरोनावर प्रतिबंधात्मक लसीची त्यांना फारशी गरज वाटत नाही. त्यामुळे कोरोना लसीकरण पथक गावात येताच त्यांना ठेंगा दाखविल्याचे प्रकार घडत असल्याचे ऐकीवात आले आहे.