अल्प प्रतिसाद मिळत असलेल्या तालुक्यातील पोहरा प्राथमिक आरोग्य केंद्रावर शुक्रवारी त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यानंतर ते बोलत होते. यापूर्वीच ४५ वर्षांवरील वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांसाठी लसीकरणाची सुरुवात झालेली आहे. माझ्यासह अनेकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. आपणदेखील आपली नोंदणी करून लस घ्यावी आणि कुठल्याही अफवांना बळी न पडता सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. घरातील सदस्य, नातेवाईकांना व मित्रांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन त्यांनी केले. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करावी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या, कोणीही त्याकडे दुर्लक्ष करू नये, वेळीच योग उपचार केले तर कोरोना निश्चित बरा होतो असे त्यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम कठाणे, आरोग्यसेविका एन. डी. गावंडे, ए. जी. साटकर, कनिष्ठ सहायक एल. पी. अतकरी, जी. ए. कच्छवे, विशाखा जांभूळकर, प्रशांत बिन्नेतकर, अनमोल लांजेवार आदी उपस्थित होते.
कोरोनाशी लढताना लस हेच कवचकुंडल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:37 AM