लवारी येथे ६५ वर्षांची परंपरा : शोभायात्रेची तयारी अंतिम टप्प्यातलवारी : लवारी येथे दरवर्षी वैकुंठचतुर्दशीला विठ्ठल-रखुमाई देवस्थान पंच कमेटीच्यावतीने विठ्ठलाची शोभायात्रा काढण्यात येते. मागील ६५ वर्षापासून ही परंपरा कायम असून शोभायात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आहे.६५ वर्षापूर्वी श्रावणजी कंटकार यांच्या पुढाकारातून संत केजाजी महाराज मंदिरातून या रथयात्रेचे प्रारंभ करण्यात आला होता. तेव्हा रथ म्हणून बैलगाडीचे छोटे होते. शोभायात्रा रात्रीला निघत असल्याने प्रकाशासाठी मातीच्या तेलावर चालणाऱ्या बत्तीचा वापर केला जाई. त्यानंतर १९७८ ला लक्ष्मीबाई लांजेवार यंनी २५ फुट उंच अशा लाखडी रथ भेट दिला. तेव्हापासुन ही प्रथा या रथातून काढण्यात येत आहे. या रथयात्रेनिमित्त लवारी येथे २४ नोव्हेंबर ला वैकुंठ चतुर्दशीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात रांगोळी स्पर्धा, पुष्पहार, पुष्पगुच्छ स्पर्धा, दंडार स्पर्धा, गेट सजावट स्पर्धा, रात्रीला शोभायात्रा व विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धा होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशिवार, जि.प. सदस्य अशोक कापगते, पं.स. सदस्या जयश्री पर्वते व डोमाजी महाराज हे उपस्थित राहणार आहेत.शोभायात्रेसाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन किरणापुरे पुरुषोत्तम कापगते, दामोधर गोटेफोडे, संदिप लांजेवार, विनोद किरणापुरे, सरपंचा लक्ष्मी परसगडे, अनिल किरणापुरे, विजय कंटकार, जयगोपाल सोनकुसरे लेसमन लांजेवार, साधु नगरीकर, देवचंद करंजेकर, नरेश नगरीकर प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)
वैकुंठ चतुर्दशीला लाकडी रथातून निघणार विठ्ठलाची शोभायात्रा
By admin | Published: November 21, 2015 12:24 AM