लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वॉलमार्ट या जागतिक कंपनीद्वारे फ्लिपकार्ड ही आॅनलाईन व्यापार करणारी कंपनी खरेदी करण्यात आली असून केंद्र सरकारच्या परकीय गुंतवणूक धोरणांना बगल देऊन वॉलमार्टने भांडवली ताकतीच्या जोरावर भारताच्या किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण करीत आहे. त्यामुळे भारतातील कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, किराणा यासह सर्वच क्षेत्रात विक्रेत्यांना मोठा फटका बसणार आहे. देशातील व्यवसाय मोठ्या प्रमाणात मोडीत निघणार आहे. वॉलमार्टतर्फे विदेशी कंपन्याच्या मालाचा पुरवठा होणार असल्याने भारतीय उत्पादकांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा या मागणीसाठी भंडारा कंझुमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन फेडरेशन भंडारा व किरकोळ किराणा असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भंडारा कंझुमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन फेडरेशनचे अध्यक्ष अनिल मल्होत्रा, उपाध्यक्ष विवेक बोरसे, सचिव रवी राजाभोज, सदस्य संदीप गुरबानी, राहुल निर्वाण, संजू मंगवानी, वासू वधवानी, अमित कोल्हे, किरकोळ किराणा असोसिएशनचे अध्यक्ष मनोज संघानी, सदस्य सुरेश निहार, राजू भोजवानी, मुनीश्वर चकोले यांच्यासह शहरातील व्यापारी सहभागी होते.