गत चार-पाच वर्षांपासून महावितरणने कृषी वीज बिलाकडे दुर्लक्ष केले होते. महावितरण नियमित शेतकऱ्यांच्या शेतावरील वापरलेल्या विजेचे मीटर वाचन न करता अनाठाई वारेमाप बिल पाठवत असल्याने शेतकऱ्यांनी बिल भरण्याचे टाळले. त्यामुळे थकीत वीज बिलाचे प्रमाण आपोआपच वाढत गेले. पालांदूर केंद्रांतर्गत १७११ शेतकऱ्यांकडे सहा कोटी ३७ लाख रुपये थकीत आहेत. आता कृषी विभागाने वीज बिलात सप्टेंबर २०२० च्या बिलातील ५० टक्के मूळ थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ करण्याचे जाहीर केले आहे, तसेच सप्टेंबर २०२० पर्यंतचा विलंब आकार पूर्णपणे अर्थात १०० टक्के माफ, सप्टेंबर २०१५ पूर्वीपर्यंत थकीत बाकीवरील व्याज पूर्णपणे माफ, सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील व्याज १८ टक्के न आकारता वीज आयोगाने मान्यता दिलेल्या दराने आकारणीचे नियोजन करण्यात आले आहे. या बैठकीला कार्यकारी अभियंता श्री कुमार, अभियंता टेकाम , उपकार्यकारी अभियंता राजन लिमजे, प्रधान तंत्रज्ञ हिरामण बारई, उपसरपंच हेमराज कापसे, पोलीस पाटील रमेश कापसे उपस्थित होते.
बॉक्स
शेतकऱ्यांना मागणीनुसार तत्परतेने नवीन वीज कनेक्शन पुरविण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. ३० मीटरपर्यंतच्या अंतरावर शेतकऱ्याला ३० दिवसांच्या आत सर्व्हिस केबलने कनेक्शन मिळेल. २०० मीटरपर्यंत त्यानंतर आता तीन महिन्यांत केबलद्वारे कनेक्शन देण्यात येईल. ६०० मीटरपर्यंतच्या अंतराला प्रतीक्षा यादीप्रमाणे एचव्हीडीएसद्वारे कनेक्शन पुरविण्यात येईल. ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल कार्यालयात जमा केल्यास प्रति बिलाला पाच रुपयांचे कमिशन ग्रामपंचायतला मिळेल, तसेच शेतकऱ्याकडून थकीत वीज बिलाची वसुली केल्यास थकीत वीज बिलाच्या २० टक्के रक्कम ग्रामपंचायतला मिळेल, असे सांगण्यात आले.