लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा भंडारा व संघटनेच्या राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या व राज्यातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्य सचिवांना मागण्यांचे निवेदन दिले. या मंत्रालयीन दौऱ्यात कास्ट्राईबचे उपमहासचिव सूर्यभान हुमणे यांच्यासह अन्य पदाधिकारी हजर होते.भंडारा जिल्ह्यातील व राज्यातील कर्मचाऱ्यांच्या समस्या संबंधाने मंत्रालय येथे विभागनिहाय समस्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील रँडम, विस्थापित शिक्षकांवर झालेला अन्यायासंबंधाने ग्रामविकास उपसचिव गिरीश भालेराव, अव्वर सचिव प्र.शि. कांबळे यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी सदर अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच घेवून कार्यवाही करावी, असे सांगितले.त्यानुसार संघटनेचे जिल्हा पदाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेवून अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्यासंबंधी निवेदन देण्यात येणार आहे. राज्यातील घड्याळी तासिकांवरील शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे तसेच त्यांना मिळणारे मानधन अत्यंत कमी असल्याने त्यांच्या मनधनात वाढ करण्यात यावी व कला, क्रिडा शिक्षकांना सेवेत सामावून घ्यावे, मानधनात वाढ करण्या यावी यासंबंधाने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व मदन येरावार राज्यमंत्री सामान्य प्रशासन यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.राज्यातील कर्मचाºयांना आरक्षणाने पदोन्नती करण्यता यावी तसेच राज्यातील रिक्त पदे तात्काळ भरती करण्यात यवेून कंत्राटी कर्मचाºयांना आरक्षणाने पदोन्नती करण्यात याव्यात, वर्ग ४ च्या कर्मचाºयांना जुन्याच सेवा शर्तीनुसार पदोन्नती करण्यात याव्यात यासंबंधाने सिताराम कुटे सचिव सेवा व प्रशासन यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.सामाजिक न्याय विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यासंबंधाने उपसचिव यांच्याशी चर्चा करण्यात आली. सामाजिक न्याय विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यासंबंधाने उपसचिव यांच्याशी चर्चा करण्यात आली.आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्याशी राज्यातील एनएचएम अंतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविका यांना विना अट जि.प. आरोग्य सेवेत व राज्य आरोग्य सेवेत रिक्त पदांवर कायम करण्यात यावे यासंबंधाने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.बंधपत्रित आरोग्य सेविकांना ते कार्यरत असलेल्या ठिकाणी कायम करण्यता यावे यासंबंधाने चर्चा करण्यात आली. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व वित्त सचिव एस.के. मदान यांच्याशी सातवा वेतन आयोग, ५ दिवसाचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष अथवा ३३ वर्ष सेवा याबाबद निवेदन देवून चर्चा करण्यात आली. भुविकास बँकेच्या कर्मचाºयांना त्यांना मिळणारा आर्थिक लाभ लवकर देण्यात यावा याबाद सहकार सचिव आभा शुक्ला यांच्याशी निवेदन देवून चर्चा करण्यात आली. इतरही विभागातील सचिव, उपसचिव यांच्याशी भेट घेऊन कर्मचाºयांच्या समस्याबाबद अवगत करण्यात आले. यावेळू उपमहासचिव सुर्यभान हुमणे यांच्या सोबत भंडारा जिल्ह्याचे सचिव हरिश्चंद्र धांडेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोवते, अकोला विभागीय सचिव सुनिल तायडे, अकोला जिल्हा अध्यक्ष दादाराव इंगळे, घड्याळी तासकिा शिक्षक होमेंद्र तरोणे, विद्यानंद बडोले व संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिवांना दिले विविध मागण्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:30 PM
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा भंडारा व संघटनेच्या राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या व राज्यातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्य सचिवांना मागण्यांचे निवेदन दिले. या मंत्रालयीन दौऱ्यात कास्ट्राईबचे उपमहासचिव सूर्यभान हुमणे यांच्यासह अन्य पदाधिकारी हजर होते.
ठळक मुद्देकास्ट्राईब संघटनेचा पुढाकार : कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा