तालुक्यात जीवनाश्यक बाबींची दुकाने सोडून इतर दुकाने बंद राहणार आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचे दुकान दर मंगळवारी पूर्णपणे बंद राहतील. इतर दिवशी सकाळी ७ ते ११ पर्यंत दुकाने सुरू राहतील. शासकीय व खासगी दवाखाने, सर्व औषधांची दुकाने, सर्व पॅथॉलॉजी केंद्र, दुग्ध संकलन केंद्र , नाश्ता, जेवणाची पार्सल रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. चष्म्याची दुकाने मंगळवार सोडून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
खासगी दवाखाने, सर्व प्रकारची दुकाने, फळे, भाजीपाला विक्रेते व इतर काम करणाऱ्या व्यक्ती, नोकर व हमाल यांना दर दहा दिवसांनी कोरोना चाचणी करून प्रमाणपत्र सोबत ठेवणे अनिवार्य असल्याचे आदेश दिले आहेत. बंद असणारी दुकाने सुरू केल्यास, विहित वेळेनंतर सुरू असणारी दुकाने यांच्यावर दंडात्मक, प्रसंगी फौजदारी कारवाई महसूल पथक, पोलीस पथक, नगरपंचायत व ग्रामपंचायतीचे प्रशासकीय पथक यांनी करावयाची आहे.